कंत्राटदारामार्फत वसुली

By Admin | Updated: March 26, 2017 04:41 IST2017-03-26T04:41:23+5:302017-03-26T04:41:23+5:30

स्थायी समितीने केडीएमसीचे उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे उपाय सुचवले असून त्यामध्ये फेरीवाल्यांच्या

Recovery through Contractor | कंत्राटदारामार्फत वसुली

कंत्राटदारामार्फत वसुली

 कल्याण : स्थायी समितीने केडीएमसीचे उत्पन्न वाढवण्याकरिता वेगवेगळे उपाय सुचवले असून त्यामध्ये फेरीवाल्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याकरिता तसेच त्यांच्याकडून बाजार फी वसुली वाढवण्याकरिता या विभागाचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे.
सिटी डिझास्टर रिस्पॉन्स टीम : पावसाळ्यात तसेच आपत्कालीन स्थितीत तातडीने कार्यरत होण्यासाठी अग्निशमन विभागाच्या नियंत्रणाखाली सिटी डिझास्टर पथक. (तरतूद २५ लाख)

कल्याण खाडीकिनारी शिवस्मारक
कल्याण खाडीकिनारी शिवरायांचे भव्य असे आरमार स्मारक उभारण्यासाठी तरतूद केली आहे.
मुंबईतील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा झाली, तेव्हा कल्याणमधील शिवस्मारकाचे काय झाले, असा सवाल ‘लोकमत’ने केला होता.

करसवलत
इमारतीमध्ये अथवा सोसायटीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीम आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा खत प्रकल्प उभारल्यास करामध्ये ५ टक्के सवलत.


सेफ सिटी मिशन
शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाचे रस्ते आणि चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. (तरतूद ५२ कोटी)

फडके उद्यान
आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नेतिवली टेकडीच्या ठिकाणी एका गुहेत काही काळ वास्तव्य होते. त्या टेकडीवर निसर्ग उद्यान विकसित करणार.

इकोफ्रेण्डली सिटी
प्रत्येक प्रभागात रेन वॉटर हार्वेंस्टिंग करणार. वन विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रात तब्बल ५० हजार नवीन झाडे लावण्याचा संकल्प. शहराला मोठा खाडीकिनारा लाभला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २ किमी खाडीकिनाऱ्याचे आणि ७ तलावांचे सुशोभीकरण.

वायफाय सिटी
शहरातील नागरिकांना वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आॅप्टीकल फायबर नेटवर्क उभारणार.

क्लीन सिटी मिशन
शहर स्वच्छता अभियानांतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर माझा प्रभाग स्वच्छ, प्रभाग स्पर्धा यात प्रत्येक प्रभागांतर्गत माझी सोसायटी-स्वच्छ सोसायटी किंवा माझी चाळ-स्वच्छ चाळ स्पर्धांचे आयोजन करून बक्षिसे देण्याची योजना राबवणे. (तरतूद ५० लाख)

उत्पन्नाचे स्रोत
मालमत्ताकर- ५०३ कोटी
स्थानिक संस्थाकर- २७७ कोटी
पाणीपट्टी- ८३ कोटी
बाजार फी- ७ कोटी
एकूण ५३ कोटी ३० लाख

टिटवाळा आणि काळातलावमध्ये नौकानयन, बीओटीचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून एलईडी जाहिराती, पार्किंग धोरण यातून ६५ कोटी ७ लाख
रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.

 

Web Title: Recovery through Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.