आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:02 IST2017-08-02T02:02:26+5:302017-08-02T02:02:26+5:30
तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

आठवडी बाजार समस्यांच्या विळख्यात
मुरबाड : तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर असलेला मुरबाड मधील आठवडी बाजार हा सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यातच ग्राहकांनी या बाजाराकडे सपशेल पाठ फिरवल्याने व्यापारी वर्ग चिंतेत आहे. शिवाय, ग्राहक तसेच व्यापाºयांना मूलभूत सुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे, त्याचाही फटका व्यापाºयांना बसतो आहे.
तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदी - विक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दर शुक्र वारी मुरबाडमध्ये आठवडी बाजार भरवला जातो. कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने तेथे नाशिक, जुन्नर, आळेफाटा, नगर येथून व्यापारी विक्र ीसाठी भाजीपाला घेऊन येतात.
या बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबई लगतच्या या बाजार समितीला राज्य पणन महामंडळाकडून विविध विकास कामांसाठी निधी दिला जातो. मात्र, तरीही येथे येणाºया ग्राहकांची मूलभूत सोयींअभावी गैरसोय होते. तर योग्य बाजारपेठ नसल्याने व्यापाºयांना अक्षरश: चिखलात दुकान मांडावे लागते. तो माल घेण्यासाठी ग्राहक फिरकत नसल्याने शेकडो कि.मी. वरुन आलेल्या व्यापाºयांना ग्राहकांची चातकासारखी वाट पहावी लागते. काही व्यापाºयांना मोक्याची जागा हवी असल्याने जिल्हा परिषदेने बांधलेल्या सामूहिक विक्री केंद्रावर अतिक्रमण केले आहे.
आठवडी बाजारात प्रत्येक व्यावसायिकाकडून दहा रुपयांची पावती फाडली जात असून त्यांच्या सुविधांचा लवकरच विचार केला जाईल, असे बाजार समितीचे सचिव सुधीर मोरे यांनी सांगितले. व्यापारी आणि नागरिकांच्या समस्यांबाबत ते बोलत होते.