स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:37+5:302021-07-28T04:42:37+5:30

-------------- ‘नागरिकांना आर्थिक मदत द्या’ कल्याण : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वेतील खडेगोळवली, वालधुनी, अशोकनगर, शिवाजीनगर, नेहरूनगर, आनंदवाडी, ...

The realm of garbage in the cemetery | स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य

स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य

Next

--------------

‘नागरिकांना आर्थिक मदत द्या’

कल्याण : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्वेतील खडेगोळवली, वालधुनी, अशोकनगर, शिवाजीनगर, नेहरूनगर, आनंदवाडी, साई नगर, कैलासनगर येथे पूर आला होता. या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पंचनामे करून नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख शरद पाटील यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

---------------------------------------

राष्ट्रवादीची आढावा बैठक

कल्याण : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण पश्चिम, पूर्व, ग्रामीण आणि डोंबिवली या चारही विधानसभा मतदारसंघातील विधानसभा अध्यक्ष, युवक, विद्यार्थी, महिला अध्यक्षांची नुकतीच बैठक पार पडली. यात चारही विधानसभा क्षेत्रातील पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना पुढील कामासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

---------------

Web Title: The realm of garbage in the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app