प्रतीक पवारच्या धाडसामुळेच फुटली घटनेला वाचा
By Admin | Updated: February 28, 2016 01:42 IST2016-02-28T01:42:43+5:302016-02-28T01:42:43+5:30
शिवसेनेचा शाखाप्रमुख गुरुवारी वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला भररस्त्यात मारहाण करीत असताना आणि त्याची दांडगाई, मुजोरी पाहत अनेक जणांनी बघ्याची भूमिका घेतलेली

प्रतीक पवारच्या धाडसामुळेच फुटली घटनेला वाचा
ठाणे : शिवसेनेचा शाखाप्रमुख गुरुवारी वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला भररस्त्यात मारहाण करीत असताना आणि त्याची दांडगाई, मुजोरी पाहत अनेक जणांनी बघ्याची भूमिका घेतलेली असताना किंवा मोबाइलमध्ये शूटिंगपलीकडे काहीही केले नसताना, तेथून जाणाऱ्या २८ वर्षीय युवकामुळेच
या घटनेला वाचा फुटल्याचे स्पष्ट झाले.
त्यानेच इतर पोलिसांच्या मदतीने शाखाप्रमुख शशिकांत कालगुडेला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. इतकेच नव्हे,
तर पेशाने वकील असलेला हा युवक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
ठाणे न्यायालयात थांबला होता. प्रतीक पवार या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळेच शशिकांतला कोठडीची हवा खावी लागली. (प्रतिनिधी)
खरेच अशा घटना जेव्हा समाजात घडतात, तेव्हा बघ्याची भूमिका न घेता, सुजाण नागरिक म्हणून आधी इतरांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे, असे मी समजतो आणि त्याच भावनेतून मी मदत केली.
- प्रतीक पवार, वकील