शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

अंधकारमय जीवनात आशेचा किरण

By admin | Updated: October 30, 2016 02:35 IST

दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी

- प्रज्ञा म्हात्रेदिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. अंधाराला मागे टाकून आशेचा किरण पुढे घेऊन जाणारा उत्सव. पण, घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या मुलांना दिवाळी म्हणजे काय, हे माहीत नव्हते. अशा मुलांच्या जीवनात बिलिंडा परेरा आशेचा किरण घेऊन आल्या आणि त्यांचे जीवन उजळून गेले... घरी अठरा विश्वे दारिद्रय असल्यामुळे दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना ही मुले पाहायची. कोण पैसे देते का, कोण खायला देते का, या आशेने ही मुले रस्त्यांवर भटकत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले घराबाहेर पडत. रस्त्यावर कुणी फटाके फोडले की, ते गोळा करत. आपल्याला इतरांप्रमाणे दिवाळी साजरी करता येत नाही, हे पाहून ढसढसा रडत. अंधकारमय जीवन जगणाऱ्या या मुलांच्या आयुष्यात २००७ मध्ये आशेचा किरण आला. प्रकाशवाट दाखवणारी होती बिलिंडा परेरा. त्यांनी या मुलांची जबाबदारी घेतली. शिक्षणाबरोबर त्यांच्या आयुष्यात प्रत्येक सण, उत्सव आणला. यापूर्वी दुसऱ्यांची दिवाळी पाहणारी ही मुले बिलिंडा यांच्यासमवेत १० वर्षे दिवाळी आनंद, उत्साहाने साजरी करत आहेत. या आनंदापासून आम्ही कोसो दूर होतो. आता मात्र इतरांप्रमाणे आम्हीही दिवाळी साजरी करतो, अशी भावना या मुलांनी व्यक्त केली. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बिलिंडा या एकदा चहा पित असताना दोन मुले त्यांच्याकडे पैसे मागायला आली. त्या वेळी त्यांनी मी तुम्हाला पैसे नाही तर चहा-बिस्कीट देईन, असे सांगितल्यावर, चालेल आम्हाला असे ती आनंदाने म्हणाली आणि रोज ही मुले त्यांच्याकडे येऊ लागली. तुम्ही माझ्याकडे शिकणार का, असे विचारल्यावर या मुलांनी होकार दिला. २००७ मध्ये उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेवर त्यांनी आपली ‘करुणाघर’ या नावाने शाळा सुरू केली. सुरुवातीच्या काळात बिलिंडा यांनी त्यांना गणित शिकवण्यास सुरुवात केली. स्वत:कडेच वही, पुस्तक नसल्याने माचीसच्या काड्यांच्या मदतीने ते हा विषय शिकवत. बिलिंडा या खाऊ देत असल्याने या दोन मुलांच्या ओळखीने हळूहळू त्यांच्या ओळखीची मुलेही शाळेत येऊ लागली आणि दोन मुलांपासून सुरू झालेली ही शाळा २२ मुलांची झाली. या मुलांना साक्षर करून बिलिंडा यांनी त्यांना शाळेत दाखल केले. सुरुवातीला बिलिंडा यांना या मुलांच्या पालकांनी तीव्र विरोध केला. परंतु, त्यांचीही समजूत काढत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. २०१५ पर्यंत त्यांची शाळा उपवन येथील स्वच्छतागृहाच्या जागेत सुरू होती. परंतु, आता तिथे काम सुरू झाल्याने या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून त्यांनी भाडेतत्त्वावर जागा घेतली. बिलिंडा आणि त्यांची ही मुले एका स्पर्धेत जिंकली होती. त्यातून त्यांना जे पैसे पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले, त्यातून ही जागा घेतली. नववी, दहावी इयत्तांत शिकणाऱ्या या मुलांना त्यांनी शिकवणीही लावली. लक्ष्मी मोर्या या चिमुकलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. ‘करुणाघर’मध्ये येण्याआधी मी इकडेतिकडे भटकत असे. दिवाळीला कधी वडिलांकडे पैसे मागितले तर ते द्यायचे नाही. उलट, ओरडायचे. मग, मी हताश होऊन दुसऱ्यांना दिवाळी साजरी करताना पाहत बसायचो. आता मात्र दिवाळीत आम्हाला सर्वच मिळते. आज आम्हाला काहीही कमी पडत नाही.- सोनू यादव, विद्यार्थी आता आम्ही दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. - रोशनी भोये, विद्यार्थिनी आमचे सहा जणांचे कुटुंब. आई सतत आजारी. वडिलांवर सर्व घराची जबाबदारी. घरात पैशांची चणचण असल्याने दिवाळी सणच माहीत नव्हता. इतरांना पाहून मला पण नवीन कपडे मिळावे, असे वाटायचे. ‘करुणाघर’मध्ये आल्यावर आता भरभरून मिळते. - सुप्रिया वाळंज, विद्यार्थिनी