तोतया आरपीएफ जवानांना अटक
By Admin | Updated: January 25, 2017 04:41 IST2017-01-25T04:41:15+5:302017-01-25T04:41:15+5:30
आरपीएफचे जवान असल्याची बतावणी करून कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सातवर प्रवाशांना लुटणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक

तोतया आरपीएफ जवानांना अटक
कल्याण : आरपीएफचे जवान असल्याची बतावणी करून कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सातवर प्रवाशांना लुटणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत वडजे आणि देव जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दर्शन हवले (रा. नवी मुंबई) हा कामानिमित्त सोमवारी रात्री कल्याणमध्ये आला होता. फलाट क्रमांक सात शेजारील झुडपात तो लघुशंका करत असताना प्रशांत आणि देव यांनी त्याला हटकले. ‘तू येथे चोरी करतोस का? आम्ही आरपीएफचे जवान आहोत,’ अशी बतावणी करत दर्शनाच्या पॅन्टच्या खिशातून मोबाइल आणि रोकड काढून घेतली. याप्रकरणी दर्शन याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी प्रशांत आणि देव यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)