शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा

By अजित मांडके | Updated: April 5, 2023 14:37 IST

महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत.

ठाणे : कोरोना आणि एच ३ एन ३ इनफ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण ठाणे शहरात वाढू लागल्याने ठाणेकरांमध्ये चिंता वाढली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सर्तक झाली आहे. शहरात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३३४ एवढी आहे. यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इनफ्ल्युएंझा आजाराचे २९ रुग्ण आतापर्यंत शहरात आढळले आहेत.  त्यातील दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यानुसार शहरात नव्याने सहा रुग्णांचा मृत्यू मागील काही दिवसात झाल्याचे दिसत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे मानले जात असले तरी देखील १ एप्रिल पासून कोव्हॅक्सिन आणि १ फेब्रुवारी पासून कोव्हीशिल्ड लसच उपलब्ध होऊ न शकल्याने लसीकरण देखील बंद असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसात कोरोनासह एच ३ एन २ इनफ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. महापालिकेकडे सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४९२ बेड उपलब्ध आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला कोरोनाच्या नवीन ३३४ सक्रीय रुग्ण दिसत आहेत. तर मंगळवारी शहरात ४१ नवे रुग्ण आढळून आले होते. तर आतापर्यंत या आजाराने ४ जणांचा मृत्यु झाला आहे. मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत महापालिका हद्दीत झपाट्यान वाढ होतांना दिसत आहे.  तसेच एच ३ एन २ इनफ्ल्युएंझा रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. 

सध्या महापालिका मंगळवारी नव्या शुन्य रुग्णांची भर पडली असली तरी देखील आतापर्यंत २९ रुग्ण आढळले आहेत. ५ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या ९ एवढी आहे. तर आतापर्यंत १३ रुग्णांनी या आजारावर मात केल्याचे दिसून आले आहे. तसेच यात दोघांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे.   

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या