बलात्कार करणारा तरुण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 22:56 IST2015-07-27T22:56:17+5:302015-07-27T22:56:17+5:30

नालासोपारा पूर्वेस एका कारखान्यात काम करणाऱ्या मुलीवर एका तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार

Rapeed Tarun Gajaad | बलात्कार करणारा तरुण गजाआड

बलात्कार करणारा तरुण गजाआड

वसई : नालासोपारा पूर्वेस एका कारखान्यात काम करणाऱ्या मुलीवर एका तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या तरुणास अटक केली.
इंद्रकुमार गौतम हा तरुण नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार येथे एका स्टील कंपनीत कामाला असून त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीशी मैत्री करून तिच्यावर त्याने बलात्कार केला. या प्रकराची वाच्यता तिने करू नये यासाठी सोशल मिडियावर छायाचित्रे टाकीन असे तो मुलीला धमकावत होता. बदनामीच्या भीतीने या मुलीने पोलिसात तक्रार केली नाही. दोन दिवसांपूर्वी गौतमने पुन्हा तिला धमकावून बलात्कार केल्यामुळे मुलीने हिम्मत दाखवून वालीव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्वरीत गुन्हा दाखल करून गौतमला ताब्यात घेतले. या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालामध्ये बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rapeed Tarun Gajaad