मोबाई्ल हिसकावून मुक्या तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST2021-07-04T04:27:05+5:302021-07-04T04:27:05+5:30

कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेल्वेच्या पार्सल ऑफिसच्या मागच्या बाजूला रेल्वे कॉलनीत एका मुक्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड ...

Rape of a young girl by snatching a mobile phone | मोबाई्ल हिसकावून मुक्या तरुणीवर बलात्कार

मोबाई्ल हिसकावून मुक्या तरुणीवर बलात्कार

कल्याण : कल्याण पश्चिमेतील रेल्वेच्या पार्सल ऑफिसच्या मागच्या बाजूला रेल्वे कॉलनीत एका मुक्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कोळसेवाडी परिसरात राहणारी एक मुकी तरुणी भिवंडी येथे कुरिअर कार्यालयात काम करते. ती दररोज कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकातून बस पकडते. नेहमीप्रमाणे या तरुणीला तिचा भाऊ पूर्वेतील एका ठिकाणी सोडून गेला. त्यानंतर ती चालत पश्चिमेतील सुभाष चौकात येत होती. पहाटे ५.३० वाजता रेल्वे कॉलनीत अंधार पसरला होता. याचाच गैरफायदा घेत एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका निर्जन स्थळी तिला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. ही तरुणी रडत सुभाष चौकात आली, मात्र तिच्यासाेबत झालेला प्रकार ती सांगू शकत नव्हती. त्यावेळी तिची अवस्था पाहून एका महिलेने कल्याण पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. त्यानंतर तेथे पोलीस पोहाेचले. तिची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rape of a young girl by snatching a mobile phone