पदाचा गैरवापर करत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल
By धीरज परब | Updated: April 21, 2024 18:40 IST2024-04-21T18:39:34+5:302024-04-21T18:40:57+5:30
पीडितेच्या फिर्यादी नुसार काशीगाव पोलीस ठाण्यात राघवेंद्र याच्यावर बलात्कारसह विविध कलमां नुसार १९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पदाचा गैरवापर करत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गुन्हा दाखल
मीरारोड - मीरारोड भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीला ती काम करत असलेल्या ठिकाणी वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या राघवेंद्र सुगंधी ह्याने त्याच्या पदाचा गैरवापर करत तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ ह्या काळात तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले .
पीडितेच्या फिर्यादी नुसार काशीगाव पोलीस ठाण्यात राघवेंद्र याच्यावर बलात्कारसह विविध कलमां नुसार १९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीलक्ष्मी बोरकर ह्या तपास करत आहेत .