शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:35 IST

Narendra Mehta: पोलिसांनी मेहताच्या गोल्डन नेस्ट येथील शगुन बंगल्यावर शोध घेतला असता मेहता पसार झाल्याचे आढळून आले आहे.

मीरारोड - मागासवर्गीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून गरोदर ठेवणे व मुल जन्मास घालणे, सत्ता व पदाच्या धाक धमकीने सतत लैंगिक शोषण करणे आदी प्रकरणी मीरा भाईंदर भाजपाचे वादग्रस्त नेते, माजी आमदार नरेंद्र मेहतावर मीरारोड पोलीस ठाण्यात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा व अन्य कलमांखाली शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहतांचा साथीदार संजय थरथरेसुद्धा आरोपी आहे. पोलीस मेहतांच्या बंगल्यावर अटक करण्यासाठी गेले असता ते पसार झाले. विधी मंडळाच्या चालू अधिवेशनात मेहतांच्या महिला नगरसेविकेच्या शोषणचा मुद्दा गाजला होता व गृहमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.पीडित महिला नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मेहताने लग्नाचे आमिष दाखवून गोड बोलून महिला व तिच्या कुटुंबीयांशी जवळीक साधली. पण पीडिता ही मागासवर्गिय असल्याने उघडपणे लग्नास नकार देत १३ जुन २००१ रोजी मेहताने व पिडीतेशी डहाणू येथील मंदिरात लग्न केले . घरचे जातीमुळे लग्नास होकार देणार नाहीत म्हणून योग्य वेळ आली की सर्वांसमक्ष लग्न करु असे आश्वासन दिले. मंदिरात लग्न झाले असल्याने आता आपण पती पत्नी आहोत सांगून मेहताने इच्छेविरुध्द शारीरीक संबंध ठेवले. मेहता राजकारणात उतरुन २००२ च्या पालिका निवडणुकीत मेहता अपक्ष म्हणुन निवडणुक लढले व जिंकले.त्याच दरम्यान पीडित महिला मेहतांपासुन गर्भवती राहिली. पण राजकिय कारकिर्दीवर परिणाम होईल म्हणून लग्न व गरोदर असल्याची बाब लपवून ठेवण्यास मेहताने सांगीतले. लग्न व पीडिता गर्भवती असल्याची माहिती असून देखील मेहतांनी १६ जानेवारी २००३ रोजी सुमन सिंग सोबत दुसरे लग्न केले. २२ मार्च २००३ रोजी पिडीता बाळंत झाली. पण नगरसेवक आणि दुसरे लग्न झाल्यानंतर मात्र मेहताने पीडित महिला व नवजात बाळाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. जातीचा प्रश्न तसेच राजकिय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होईल म्हणून लग्न व मुलास स्वीकारण्यास नकार देत शिवीगाळ केली. पण त्या नंतर देखील नगरसेवक पद व सत्तेचा धाक तसेच पीडितेस मारहाण करुन बाळासह मारुन टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरुच ठेवले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी मेहताने पिडीतेला नोकरी सोड सांगून निवडणुकीत मदत करायला सांगीतले. पीडितेने निवडणुकीत मेहताला मदत केली तसेच दबावाखाली सांगेल तसे वागू लागली. मेहता त्याच्या फायद्यासाठी पीडितेचा वापर करत होते व २०१२ साली तिसऱ्यांदा नगरसेवक झाले. दरम्यान पीडितेने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. मेहताचा राजकीय दबदबा वाढू लागल्याने ती दबावाखालीच राहू लागली. २०१५ मध्ये आमदार मेहताने पीडितेस नागपूर अधिवेशनला बोलावून तीचे विमान तिकीट काढल्याचे सुमन मेहतांना कळल्यानंतर बराच वाद झाला होता. पीडितेच्या मुलास सुमन यांनी त्यांच्या शाळेतून काढून टाकले. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने पिडीतेच्या मुलास शाळेत घेण्याचे आदेश दिले. त्याला शाळेत घेतले पण नंतर त्याची तुकडी बंद करण्यासह फुटबॉल संघाच्या कप्तान पदावरुन सुमन यांच्या शाळेने मुलास काढून टाकले. त्याचा मुलावर विपरीत परिणाम होऊन देखील वडील म्हणून मेहताने काहीच केले नाही.त्याच वेळी मेहताचा मित्र संजय थरथरे याने थेट पीडितेच्या कार्यालयात जाऊन मेहता सांगेल तसं वाग, त्याच्या विरोधात जाणे महागात पडेल. तो सीएमचा खास असून सत्तापण त्याची असल्याने तुला महागात पडेल अशी धमकी दिली. तसेच मुलासह दुबईला निघून जाण्यास सांगितले. घाबरुन ती मुलासह निघुन गेली पण आठवड्याभराने परत आली. मुलगा हा मेहताचा असल्याने पिडीता कायदेशीर तक्रार करेल असे वाटल्याने मेहताने नेहमीच सत्ता आणि पदामुळे दबाव व धाकात ठेवले. तसेच लैंगिक शोषण सुरु ठेवले प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात नरेंद्र लालचंद मेहता ( ४८ ) सह त्याचा साथीदार संजय थरथरे विरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी मेहताच्या गोल्डन नेस्ट येथील शगुन बंगल्यावर शोध घेतला असता मेहता पसार झाल्याचे आढळून आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असले तरी राजकीय दबदबा असणारा माजी आमदार त्यांच्या हाती लागेल का ? असा प्रश्न देखील नागरीकांमधून केला जात आहे. मेहता हे विरोधी पक्षनेते तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. मेहता सातत्याने वादग्रस्त राहिले असुन त्यांच्यावर आता पर्यंत सुमारे २० च्या घरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :BJPभाजपाRapeबलात्कारPoliceपोलिस