शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी प्रकरण : दोन आरोपी थेट दाऊदच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 03:43 IST

गोराई येथील जागेच्या वादातून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून, ते थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे - गोराई येथील जागेच्या वादातून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून, ते थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील भार्इंदर येथील एका व्यापा-याने, गोराई येथील ३८ एकर जागेचा सौदा २00७ साली मुंबईतील खार येथील टोनी लेविस याच्याशी केला होता. त्यासाठी या व्यापा-याने दोन कोटी रुपये टोनी लेविसला दिले होता. मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच जमिनीच्या वाढलेल्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाले. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच, टोनी लेविस याने जमीन मुंबई येथील भवर कोठारी आणि भरत कोठारी यांच्या नावे केली. बाजारभावाप्रमाणे ३५ कोटी रुपये किंमत असलेल्या या जमिनीच्या व्यवहारातून बाजूला होण्यासाठी, तक्रारदार व्यापा-यास कासकरसह अनिस इब्राहिमनेही धमक्या दिल्या. इक्बालच्या अटकेनंतर भवर कोठारी आणि भरत कोठारी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, ते पोलिसांना हुलकावणी देत आहेत. कोठारी हा दाऊदसोबत एके काळी सोने-चांदीची तस्करी करायचा. जैनही दाऊदच्या थेट संपर्कात असून, तो पाकिस्तानला जाऊन आला असल्याची माहिती, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. दोघेही देशाबाहेर फरार झाले असून, ते इंडोनेशिया अथवा कोलंबियात असावेत, अशी शंका शर्मा यांनी व्यक्त केली.कासकरवर ठाण्यात खंडणीचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी गोराई येथील जागेच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात, दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिमही आरोपी आहेत.हवालामार्फत दाऊदला पैसाखंडणीच्या गुन्ह्याची चौकशी करताना, इक्बाल कासकरने पोलिसांना डी-कंपनीच्या अर्थकारणाचीही माहिती दिली. खंडणीच्या गुन्ह्यातून जमवलेले दीडशे कोटी रुपये दाऊदला हवालामार्फत पाठविण्यात आले होते, असे इक्बालने पोलिसांना सांगितले. त्यापैकी काही रक्कम आपणासही हवालामार्फत मिळाली होती, अशी कबुलीही इक्बालने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाDawood Ibrahimदाऊद इब्राहिम