शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कूपनलिकांवर रांगाच रांगा, नळपाणीयोजनेत भ्रष्टाचार, नेत्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:58 IST

राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे.

शेणवा : राज्य सरकारच्या विविध योजनांतून शहापूर तालुक्यात मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनांपैकी आजही अनेक योजना अपूर्णच असून अनेक विहिरींचा व नळपाणीपुरवठा योजनांचा घोळ जैसे थे आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या डोळखांब आदिवासी ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले असून तळवाडा ग्रामपंचायत हद्दीत असणाºया रोडवहाल या आदिवासी गावात टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ६०० च्या आसपास लोकसंख्या असून ९८ घरांची वस्ती असणाºया या गावात पाणीच मिळत नाही. एक महिन्यापूर्वी पाण्यासाठी साली पिल्लू झुगरे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. परंतु, लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्षच देत नसल्याने हे भयानक प्रकरण उजेडात आले नाही.

२००४ मध्ये या ठिकाणी पाणीयोजना मंजूर झाली होती. एक कोटीची असणारी ही योजना एकच दिवस पाणी देऊन कायमची बंद झाली. या ठिकाणी दोन कूपनलिका आहेत. एक खाजगी मालकीची आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावासाठी दिली आहे. परंतु, सध्या या ठिकाणची भूजल पातळी इतकी खालावली आहे की, एक तास हपासल्यानंतर या कूपनलिकेला पाणी सुरू होते. पहाटे ३ वाजता महिलांना पाण्यासाठी नंबर लावावा लागतो. पहाटे गेलेली महिला सकाळी ८ वाजता दोन हंडे पाण्याचे घेऊन येते. तेवढेच पाणी संपूर्ण दिवस पिण्यासाठी वापरतात.

अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी पाच किलोमीटरवर असणाºया डोळखांब येथील चोर नदीवर जावे लागते. दोन वर्षांपासून या ठिकाणी टँकरच आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कूपनलिका आहेत तरीही त्यासाठी दोन हंडे पाण्यासाठी पाच तास रांग लावावी लागते. चार महिला कूपनलिका हपसायला लागतात. तर, अजून १० दिवसांनी आम्हाला सात किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी जावे लागणार असल्याचे ज्योती खाकर यांनी सांगितले.

पेंढरघोळ येथील विहिरीला मिळाला जलस्रोतगेल्या वर्षी लवकर गेलेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचे स्रोत शोधणे, हे मोठे आव्हान आहे. तरीही, सध्या पेंढरघोळ येथे बांधण्यात येणाऱ्या विहिरीला अनेक जलस्रोत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर विषयाबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळदाह’च्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची गंभीर दखल लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.

पाऊस गेल्याने पाण्याची पातळी खालावली आणि तालुक्यातील विहिरीदेखील आटल्या. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. पेंढरघोळ येथे निर्माण झालेली ही पाणीसमस्या कायमची सुटावी, म्हणून गेल्या वर्षी मंजूर झालेल्या जलकुंभाचे काम दोन दिवसांपूर्वीच लघुपाटबंधारे विभागाकडून हाती घेण्यात आले. दिवसरात्र हे खोदकाम सुरू असून ३० फुटांवरच पाण्याचे अनेक झरे लागल्याने नागरिकांसह अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या कडक उन्हातही लागलेले हे झरे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देतील, असे जाणकार सांगतात. ३३ फूट खोल आणि साडेतेरा मीटर रुंदीचा हा जलकुंभ १७ लाख रुपये खर्चून बांधण्यात येत आहेत. या जलकुंभाच्या पाण्यामुळे येथे असलेल्या आश्रमशाळेबरोबरच इतर दोन पाड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या जलकुंभाचे खोदकाम सुरू असतानाच पाण्याचे झरे लागल्याने आम्ही नक्कीच समाधानी आहोत. हे पाणी गावपाडे यांना टंचाईच्या काळात नक्कीच उपयोगी ठरेल असे लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.आर. तडवी यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईshahapurशहापूर