ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:12 PM2020-01-06T14:12:58+5:302020-01-06T14:29:14+5:30

५०० व्या विक्रमी कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्याचा नवीन वर्षाचा पहिला रविवारविनोदी एकांकिकेचे धम्माल सादरीकरणाने रंगला.

Rangalee silence on the acting lines in Thane continues | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर रंगली शांतता गडबड चालू आहे ‘द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या सदस्यांचा सत्कारएक धम्माल एकांकिकेद्वारे नवीन वर्षाची सुरु वात

ठाणे: अभिनय कट्ट्याचा नवीन वर्षाचा पहिला रविवार रंगला विनोदी एकांकिकेचे धम्माल सादरीकरणाने. एक धम्माल एकांकिकेद्वारे नवीन वर्षाची सुरु वात अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी एकदम जबरदस्त केली.
       चाळ म्हणजे विविध नमुन्यांनी भरलेला विविधरंगी विविधढंगी व्यक्तिचित्रे चाळीत आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एक चाळीतील एक सामान्य कुटुंबातील एक शांत रविवारची गडबड आणि गोंधळाची सकाळ म्हणजे प्रा.अनिल सोनार लिखित आणि परेश दळवी दिग्दर्शित  शांतता.. गडबड चालू आहे. रामराव आणि त्यांच्या पत्नी, त्यांचा मेव्हणा, त्यांची दोन कार्टी, शेजारी अय्यर आणि विवाह मंडळाचे देशपांडे यांच्या सोबत रामरावांच्या घरात सुरू झालेली गडबड संपता संपता शेजारच्या घरात गडबड सुरू होते आणि आणखी एक शांत रविवार गडबड गोंधळाची कसा होतो याचा धम्माल विनोदी सादरीकरण म्हणजे शांतता...गडबड चालू आहे. या एकांकिकेचे संगीत श्रेयस साळुंखे रंगभूषा दीपक लाडेकर, नेपथ्य काशिनाथ चव्हाण आणि दळवी यांनी सांभाळले. या एकांकिकेत चिन्मय मोर्ये, वैष्णवी चेऊलकर, अभय पवार, सहदेव साळकर, महेश झिरपे, न्यूतन लंके आणि दळवी यांनी अभिनय साकारला. तसेच २०१९ मध्ये अभिनय कट्टा बाल संस्कार शास्त्राच्या चिन्मय मौर्ये, श्रेयस साळुंखे, अमोघ डाके, अद्वैत मापगावकर, प्रथम नाईक, आदित्य भोईर, स्वस्तिका बेलवलकर, वैष्णवी चेऊलकर, पूर्वा तटकरे आणि रु चिता भालेराव बालनाट्य, एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट या क्षेत्रांत केलेल्या कामाबद्दल सत्कार करण्यात आला. सन्मान संस्थेचा, जनहिताच्या महान कार्याचा या उपक्र माअंतर्गत विविध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या संस्थेचा म्हणजेच ‘द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या सदस्यांचा सत्कार कट्ट्यावर करण्यात आला. या कार्यक्र माचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी यांनी केले. सामाजिक भान जपणाऱ्या अभिनय कट्ट्यावर नेहमीच विविध सामाजिक प्रकल्प राबविले .कट्टा क्रमांक ४६२ वर सन्मान संस्थेचा,जनहिताच्या महान कार्याचा या उपक्रमाअंतर्गत विविध संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.त्यातील पहिल्या संस्थेचा म्हणजेच द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन या संस्थेच्या सदस्यांचा सत्कार अभिनय कट्ट्यावर करण्यात आला.ह्या संस्थेमार्फत घरोघरी जाऊन रद्दी जमा केली जाते व त्यातून येणाऱ्या निधीचा उपयोग सामाजिक कामांसाठी केला जातो. संस्थेचा मूळ हेतू गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी मदत हा पुरविणे आहे. आज आम्ही समाजातील गोरगरिबांसाठी एक छोटस पाऊल उचलल आहे अभिनय कट्ट्याने दिलेल्या ह्या प्रोत्साहनामुळे आमच्या ह्या कार्याला नवीन उमेद मिळाली आहे.आपले सहकार्य सोबत असुदे बदल घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू असे मत "द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन" चे अध्यक्ष प्रणव पाटील ह्याने व्यक्त केले. नवीन वर्षाची सुरुवात शांतपणे गडबड करून आपण केली.पुढील वर्षभरात अभिनय कट्टा प्रत्येक रविवारी वाचक कट्टा गुरुवारी संगीत कट्टा शुक्रवारी वेगवेगळे विविधरंगी कार्यक्रम आपल्या सेवेस घेऊन येऊच. प्रोत्साहन हे गरजेचे असते म्हणूनच बालकलाकारांयापुढील वाटचाली साठी त्यांच्या ह्या वर्षातील कामाचे कौतुक वझालेच पाहिजे तसेच "द पेपर रेवोल्यूशन फाऊंडेशन" ही चळवळ समाजातील गोरगरिबांसाठी खूपच मोलाची आहे एक माणूस म्हणून आपण आपक्या जाणिवा जागृत ठेवून आपण आपल्यापरीने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.अभिनय कट्टा परिवार नेहमीच त्यांच्या सोबत आहे, असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.

Web Title: Rangalee silence on the acting lines in Thane continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.