आशेळेत शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांत राडा
By Admin | Updated: November 7, 2015 01:10 IST2015-11-07T01:10:47+5:302015-11-07T01:10:47+5:30
कल्याण-डोंबिवली पालिकेतील आशेळे गाव वॉर्ड-११८ मध्ये भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांतील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात हाणामारी झाली आहे. भाजपा नवनिर्वाचित नगरसेविका

आशेळेत शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांत राडा
उल्हासनगर : कल्याण-डोंबिवली पालिकेतील आशेळे गाव वॉर्ड-११८ मध्ये भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांतील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात हाणामारी झाली आहे. भाजपा नवनिर्वाचित नगरसेविका इंदिरा तरे यांच्या मुलाने सेनेच्या आप्पासा करंडेसह बाळू बने यांना मारहाण केली असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी नितीन तरे, अंकुश तुकाराम कडू यांच्यासह तिघांवर दुपारी ३ वाजता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. असेच वातावरण राहिल्यास दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत केव्हाही भडका उडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आशेळे गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे.