भिवंडीत दगडफेकीत युवक-पोलीस जखमी

By Admin | Updated: December 22, 2016 06:01 IST2016-12-22T06:01:40+5:302016-12-22T06:01:40+5:30

नळाची दुरु स्ती केल्याने त्या मार्गावरून जाण्यास मनाई केल्याने दोन युवकांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत

The rampaging riot police-police were injured | भिवंडीत दगडफेकीत युवक-पोलीस जखमी

भिवंडीत दगडफेकीत युवक-पोलीस जखमी

भिवंडी : नळाची दुरु स्ती केल्याने त्या मार्गावरून जाण्यास मनाई केल्याने दोन युवकांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत व दगडफेकीत होऊन एक युवक व पोलीस जखमी झाला. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे .
शहरातील बंगालपुरा वाझा मोहल्ला या भागात बिलाल मोमीन यांच्या घराबाहेरील पाइपलाइन तुटली असल्याने ती दुरु स्त केल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट करण्यात आले. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या कुमार हिरा गोहिल यास दुचाकी घेऊन जाण्यास त्यांनी मनाई केली. त्यामुळे मोमीन यांचा मुलगा अन्वर याच्याबरोबर कुमारची बाचाबाची झाली. त्यानंतर, बिलालच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जयेश दीपक गोहिल याच्या डोक्यास जबर दुखापत झाली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस शिपाई प्रकाश अशोक पाटील यांच्या डोक्याला दगड लागून तेही जखमी झाले.
पोलिसांनी बिलाल मोमीन, अन्वर गांधी, सलमान, मुजीब व कुमार हिरा गोहिल, अजय विनोद चव्हाण, गिरीधर गोहिल यांना ताब्यात घेतले आहे. जखमी जयेशवर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The rampaging riot police-police were injured