Rally in support of farmers from NCP; Republic Day celebrations in Ulhasnagar | राष्ट्रवादीकडून शेतकरी समर्थनार्थ रॅली; उल्हासनगरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादीकडून शेतकरी समर्थनार्थ रॅली; उल्हासनगरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उल्हासनगर : महापौर लिलाबाई अशान यांच्या हस्ते महापालिका प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासह उपमहापौर भगवान भालेराव, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे, स्थायी समिती सभापती विजय पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. 

शहरात ध्वजारोहणचा मुख्य सोहळा उपविभागीय कार्यालयाच्या पटांगणात पार पडला. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सहायक पोलिस उपायुक्त डी टी टेळे यांच्यासह तहसीलदार विजय वाकोडे, उपमहापौर भगवान भालेराव, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोट्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपायुक्त कार्यालय पटांगणात पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते तर सहायक पोलिस आयुक्त कार्यालय डी टी टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय, शहरातील चारही पोलीस स्टेशन, शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, विविध पक्ष कार्यालय, सामाजिक संस्था आदी ठिकाणी उत्सवात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष किरण कौर धामी, राष्ट्रवादी पक्षाचे भरत गंगोत्री यांच्या उपस्थिती शेतकरी समर्थनार्थ काही नागरिकांनी रैली काढण्यात आली. रैली मध्ये शेकडो जण सहभागी झाले होते.

Web Title: Rally in support of farmers from NCP; Republic Day celebrations in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.