रक्षाबंधन २०२० साजरे होणार टपाल सेवेमार्फत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:02 PM2020-08-01T17:02:01+5:302020-08-01T17:02:13+5:30

त्या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. ग्राहकांनी या राखी पाकिटाला पसंती दिली आहे.

Rakshabandhan 2020 will be celebrated through postal service | रक्षाबंधन २०२० साजरे होणार टपाल सेवेमार्फत

रक्षाबंधन २०२० साजरे होणार टपाल सेवेमार्फत

Next

ठाणे : यंदा करोनाच्या वातावरणात राखी पौर्णिमेला बहिणीला भावाकडे राखी बांधायला जाणे शक्य होणार नाही. अशावेळी टपालखाते मदतीला पुढे सरसावले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष राखी पाकीट उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व टपाल कार्यालयात है राखी पाकीट दहा रुपये या माफक किमतीला उपलब्ध आहे. त्या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. ग्राहकांनी या राखी पाकिटाला पसंती दिली आहे.

ठाणे विभागात सर्व टपाल कार्यालयात राखी पाकीटाचे बुकिंग करण्यासाठी काउंटर उघडले असून, राखी पाकिटे ट्रे मध्ये लगेच वेगळी करून पुढील गंतव्य स्थानाकडे पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच राखी मेल अंतर्गत त्याच्या वितरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. तसेच प्रवासाकरिता वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे होण्यासाठी टपालखाते पुढे सरसावले आहेत.

राखी भावापर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातही विशेष काळजी घेऊन केवळ राखी मेलची डिलिवरी सर्व विभागातील टपाल कार्यालयात रविवारी ०२.०८.२०२० या सुट्टीच्या दिवशी केली जाईल, असे नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी एका वृत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शनिवारी बकरी ईदची सुट्टी व सोमवारी रक्षाबंधन आहे. त्यामुळे जनतेला रक्षाबंधनापूर्वी राखी पाकीट मिळावीत यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार, रविवारी दि.०२.०८.२०२० या दिवशी ठाणे विभागातही डाक सेवकानी हजर राहून राखी मेल डिलिवरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भावाला घरबसल्या बहिणीची राखी पोचेल.

Web Title: Rakshabandhan 2020 will be celebrated through postal service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.