शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उल्हासनगरात कलानी विरुद्ध राजवानी आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:56 PM

कमलेश निकमवर गुन्हा दाखल : वादग्रस्त वक्तव्य भोवले

सदानंद नाईक उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भरत राजवानी (गंगोत्री) यांनी आक्षेप घेऊन हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिखी दखल घेऊन पोलिसांनी निकम यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने भरत राजवानी (गंगोत्री)  विरुद्ध कलानी असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाटिया चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी १९९० च्या दरम्यान पप्पू कलानी यांच्याशी एका राजवानी नावाच्या इसमाने टक्कर दिल्यावर त्याचे काय झाले. तसेच ओमी यांच्यासोबत कोणी एका राजवानी नावाच्या इसमाने टक्कर दिल्यास त्याचेही तसेच होणार असल्याचे वक्तव्य केले. 

हा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते, सभागृहनेते व कलानी यांचे राजकीय विरोधक भरत राजवानी (गंगोत्री) यांच्या घरासमोरील भाटिया चौकात झाला. निकम यांच्या वक्तव्यावर गंगोत्री यांनी आक्षेप घेऊन यामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला.

पप्पू कलानी यांचे राजकीय स्पर्धक म्हणून गोपाल राजवानी १९९० सालानंतर पुढे आले. महापालिका स्थापन झाल्यावर त्यांची उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणातच हत्या झाली होती. यामध्ये पप्पू कलानी यांच्यासह अन्य जण आरोपी होते. आता भाटिया चौकातील कार्यक्रमात निकम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार भरत राजवानी यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात केली. तिची दखल घेऊन निकम यांच्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर