शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

बेस्ट लक खांडेकर! सायकलवर करणार १९ हजार ८०० किमीचा परदेश प्रवास

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 17, 2025 18:02 IST

आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनने दिली माहिती. खांडेकर यांनी देश-विदेशात आतापर्यंत ६० हजारो हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनचे सदस्य, ठाणेस्थित ५२ वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा १९ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्यावतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

खांडेकर यांनी देश-विदेशात आतापर्यंत ६० हजारो हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केलेला आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्याने सुरू करून एक नवा विक्रम रचणार आहेत. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. २० जून २०२५ रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोचल्यावर २४ जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होणार आहे. यादरम्यान ते १७ देश पूर्ण करणार आहेत अशी माहिती खांडेकर दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे, निवासाचे साहित्य देखील सोबत नेणार आहेत. आणि प्रवासादरम्यान स्वतः जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट रहा, हिट रहा, त्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. खांडेकर यांचा हा प्रवास नऊ महिन्यांचा आहे. आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेचे सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

-------------खांडेकर यांनी 23 किलो वजनाची पुशिंग सायकल स्वतः तयार केली आहे. ही सायकल एका पायाने ढकलावी लागते अशाप्रकारे त्यांनी या सायकलवर साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला आहे.

टॅग्स :Cyclingसायकलिंग