कल्याण-डोंबिवलीच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी राजेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST2021-09-05T04:45:15+5:302021-09-05T04:45:15+5:30

कल्याण : शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवलीच्या उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. कदम यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम करून ...

Rajesh Kadam as Shiv Sena sub-district chief of Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी राजेश कदम

कल्याण-डोंबिवलीच्या शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी राजेश कदम

कल्याण : शिवसेनेच्या कल्याण-डोंबिवलीच्या उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. कदम यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता.

मुळात कदम हे शिवसेनेच्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते आहेत. परंतु, त्यांनी शिवसेना सोडून मनसेच्या स्थापनेपासून मनसेचे काम केले.

डोंबिवली विधानसभेची निवडणूकही लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. डोंबिवली शहराध्यक्ष पद मनसेने त्यांना दिले होते. प्रदेश पदाचीही जबाबदारी दिली होती. मनसेत केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे ते चर्चेत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिवसेनेत आल्यावर त्यांना कोणतेही पद दिले गेले नव्हते. त्यामुळे त्यांना कोणतेही भाष्य करता येत नव्हते. संघटनेने आता त्यांच्यावर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

------------

Web Title: Rajesh Kadam as Shiv Sena sub-district chief of Kalyan-Dombivali