राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बाळू पाटील यांची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:04 AM2021-04-13T00:04:31+5:302021-04-13T00:04:51+5:30

Thane District Central Bank : राजेंद्र पाटील हे सामान्य शेतकरी असतानाही त्यांनी सहकार क्षेत्रात उडी घेत सायवन सेवा सोसायटी संच, सहकारी भात गिरणी शिवणसई, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती.

Rajendra Patil elected Chairman and Balu Patil as Vice Chairman of Thane District Central Bank | राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बाळू पाटील यांची निवड 

राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बाळू पाटील यांची निवड 

googlenewsNext

पारोळ : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोपाळ पाटील हे पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. ते वसई तालुक्यातून प्राथमिक कृषीपुरवठा या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते, तर उपाध्यक्षपदी बाळू पाटील यांची निवड करण्यात आली.
राजेंद्र पाटील हे सामान्य शेतकरी असतानाही त्यांनी सहकार क्षेत्रात उडी घेत सायवन सेवा सोसायटी संच, सहकारी भात गिरणी शिवणसई, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर त्यांनी उत्तम कामगिरी केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत वेगवेगळ्या योजना आणल्या. आपल्या सामान्य शेतकऱ्यांना हायटेक शेतीची माहिती व्हावी, यासाठी त्यांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा परदेशी दौरा आयोजित केला होता. महिलांचे सबलीकरण व्हावे, यासाठी महिला बचत गटांना कर्ज योजना सुरू केल्या. त्यांच्या मागील अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेने मोठी भरारी घेतली.

पॅनलच्या विजयात हात 
आ. हितेंद्र ठाकूर, खा. कपिल पाटील आणि आ. किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनेलने विजय मिळवला. या पॅनेलच्या विजयात पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यामुळे सहकार पॅनेलने अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवली.

Web Title: Rajendra Patil elected Chairman and Balu Patil as Vice Chairman of Thane District Central Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.