शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 22:03 IST

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?"

ही पहिली निवडणूक मी बघतोय, ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीय. कोणताही विषय नसल्याने सर्वजण आई-बहिणींवरून एकमेकांचा उद्धार करत आहेत. खरे तर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत ते विषय यायला हवेत. काय निवडणूक सुरू आहे? कशावर निवडणूक सुरू आहे? वडील चोरले... फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही. कधी होणारही नाही. पण आज जे बोलत आहेत, आमचा पक्ष फोडला, आमपचा पक्ष फोडला. तुम्ही जे सर्व एकत्र बसला आहात, कोणत्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केले आहेत? अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर एकाच वेळी हल्ला चढवला. ते ठाण्यात श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात पैकी सहा नगर सेवक फोडले होते ना? - फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं? आहो मागीतले असते तर दिले असते. पण काय आहे, त्याला म्हणतात ना ढेकनासंगे हीराही भंगला... बरोबर शरद पवार बसले आहेत."

फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात शरद पवारांनी केली - "या फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात कुणी केली असेल, तर ती शरद पवारांनी केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. मग पुलोद स्थापन केलं. महाराष्ट्रात पहिलं फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं. मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगण भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेने फाडायला लावली. तेव्हा शिवसेनेचे आमदार फोडायचं काम याच शरद पवारांनी केलं होतं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी आपलं काय माझा बाहेरून पाठींबा आहे. त्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला कुठे आजून फेविकॉल लागला आहे?" असेही राज म्हणाले. 

"यानंतर, नारायण राव राणे यांच्या बरोबर आमदार घेऊन त्यावेळी काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेने फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसलं नव्हतं," असेही राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thaneठाणेRaj Thackerayराज ठाकरेShrikant Shindeश्रीकांत शिंदेnaresh mhaskeनरेश म्हस्केShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार