शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करणं चुकीचंच, पण राज ठाकरे भाग्यवान नेते; जितेंद्र आव्हाडांचा 'पक्षबदलू' नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:45 IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ठाणेः मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, खरं तर आत्महत्या करणं चुकीचे आहे, पण अशा परिस्थितीत काही जण राजकारणात निष्ठेची विष्ठा करताना दिसताहेत. 40-50 वर्षे ज्यांची खानदानं सत्तेत होती ते सत्तेच्या लाचारीसाठी इथे तिथे जाताना दिसताहेत.पण कळव्यातील प्रवीण चौगुलेने राज ठाकरे यांच्या निष्ठेपायी आत्महत्या केली, कळव्यातील प्रवीण चौगुले हा कार्यकर्ता केवळ राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं अस्वस्थ होता. माझ्या नेत्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, असे कुठेच दिसत नाही. दररोज सकाळी दुर्बिण लावून शोधावे लागते कुठले कार्यकर्ते कुठे गेलेत. सत्ता येणार नाही, नगरसेवक होणार नाही हे माहीत असतानाही नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणं हे काही सोपं नाही. राज ठाकरेंसारख्या भाग्यवान नेत्याला सलाम, हे भाग्य फार लोकांच्या नशिबी येत नाही. नेत्यासाठी कार्यकर्ता प्राण पणाला लावेल हे आजच्या काळात काही वेगळंच वाटतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीणची आत्महत्या महाराष्ट्राला चटका लावणारी आहे. प्रवीण भाजपाच्या घाणेरड्या राजकारणाचा बळी आहे. कार्यकर्त्यांनी संयम राखावा अन् कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, ही मी विनंती करतो, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. महाराष्ट्र सैनिक प्रवीणचे भाऊ आहेत ते सर्व त्याचे पुढील संस्कार करतील, असंही देशपांडेंनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड