शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

By अजित मांडके | Updated: October 25, 2024 07:38 IST

शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाण्यातील मनसैनिकांचा गुरुवारी हिरमोड केला. ठाण्यात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज रॅलीत सहभागी होणार म्हणून मनसैनिक सकाळी १० वाजल्यापासून ताटकळले होते. मात्र ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर राज काळ्या काचेच्या गाडीतून थेट निवडणूक कार्यालयात गेले. जाधव यांनी अर्ज दाखल करताच काही मिनिटांत ते निघून गेले. काही दिवसांपूर्वी टोलमुक्तीच्या निर्णयानंतर शक्तिप्रदर्शनाची संधी साधण्यासाठी ठाण्यातील पदाधिकारी सज्ज असताना राज यांनी मिसळ आणि मिठाईवर ताव मारून मुंबईचा रस्ता धरला होता.

ठाण्यातून मनसेचे अविनाश जाधव नशीब अजमावत आहेत. राज हे जाधव यांचा अर्ज भरण्याकरिता येणार असल्याने विष्णूनगर परिसरातील मनसेच्या कार्यालयाजवळ मनसैनिकांनी १० वाजल्यापासून गर्दी केली होती. राज थोड्या वेळात येतील व जाधव यांच्या रॅलीत सहभागी होतील, असे सांगितले जात होते. रॅली संपून जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर १० मिनिटांनी काळ्या काचेच्या गाडीतून राज यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जाधव यांनी अर्ज भरताच राज यांच्या मोटारींचा ताफा सुसाट बाहेर पडत होता. परंतु ‘उमेदवारासोबत किमान फोटो तरी काढा’ अशी विनंती मनसैनिकांनी केल्यानंतर अखेर राज गाडीतून बाहेर आले. फोटोसेशन केले आणि पुन्हा गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला.

शरद पवारांची भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शरद पवार उपस्थित होते. उघड्या गाडीतून भर उन्हात तब्बल अर्धा तास रॅलीत पवार सहभागी झाले. मात्र त्याच वेळी राज यांनी जाधव यांच्या रॅलीत सहभागी होणे टाळून एसी गाडीतून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्याची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेthane-acठाणे शहरAvinash Jadhavअविनाश जाधवthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024MNSमनसे