शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

Mumbai Rain Update : जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 08:44 IST

पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरींनी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांचे नियोजन सपशेल कोलमडले. 

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा पसरला आहे. महिनाभरापासून पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, पण मंगळवारच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणाची पाण्याची पातळी कमी झाली असून ते देखील चिंतेचे आहे. त्यामुळे पावसाची नितांत आवश्यकता आहे. पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरींनी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांचे नियोजन सपशेल कोलमडले. 

मुंबईतील सायन भागात पाणी साचल्याची माहिती मिळल्याने काहींनी लोकल प्रवास करणे टाळले, तर काहींनी मुंबईत जाऊन अडकण्यापेक्षा शहरात राहणे पसंत केले. रक्षणधनला देखील बाजारपेठेत उत्साह नव्हता, त्यात मंगळवारच्या पावसामुळे देखील व्यापाऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरवले गेले. सकाळी जोरदार पावसाच्या सरीत अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

शहरातील इंदिरा गांधी चौकात तुलनेने कमी गर्दी होती. वातावरण ढगाळ असल्याने आणि मोठी भरती असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी गरज असेल तरच रेल्वे प्रवास करून मुंबई गाठण्याचा मानस ठेवला.  रस्त्यावर नागरिकांची तुरळक गर्दी होती. रिक्षा देखील कमी प्रमाणात रस्त्यावर होत्या.  शहरातील चिमणी गल्ली, फडके पथ, बाजी प्रभू चौक, नेहरू मैदान परिसरात भाजी विक्रेत्यांची देखील गैरसोय झाली होती. बाजारात ग्राहक कमी आल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम।झाला होता. 

- पहाटेच्या वेळेत पावसाच्या जोरदार सरी व सोसाट्याचा वारा यामुळे शहराला झोडपून काढले होते. अनेकांच्या बाल्कनीमध्ये वाऱ्यामुळे पावसाचे पाणी आले. त्यामुळे पहाटेपासून नागरिकांना पावसाचा अंदाज आला असल्याने त्यानुसार काहींनी नियोजन केले. पण अखेरीस पाऊस सकाळच्या सत्रात न थांबल्याने त्या नियोजनावर पाणी फिरवले गेले.

टॅग्स :RainपाऊसdombivaliडोंबिवलीMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMumbaiमुंबई