रेल्वेने केला टीसींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST2021-09-09T04:48:40+5:302021-09-09T04:48:40+5:30

डोंबिवली : तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्टने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत महाड, खेड, चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत केली होती. सरकार ...

Railways felicitated TC | रेल्वेने केला टीसींचा सत्कार

रेल्वेने केला टीसींचा सत्कार

डोंबिवली : तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्टने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत महाड, खेड, चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत केली होती. सरकार तसेच रेल्वे प्रशासनाने (डीआरएम व एसआरडीसीएम) त्याची दखल घेत एसआरडीसीएम टीसी व्ही. एस. मीना यांच्या हस्ते त्यांचा बुधवारी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.

तिकीट चेकिंग परिवारात महिलांचा वाढता सहभाग तसेच अनेक कार्यक्रम साजरा करताना मिळणारे सहकार्य पाहता पसदर कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या महिला तिकीट चेकिंग स्टाफने प्रशस्तिपत्र स्वीकारावे, असा परिवाराचा मानस होता. त्या कार्यक्रमात तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्टने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. नवनियुक्त डीसीटीआय मुंबई विभाग ए. एन. कडाले यांची ट्रस्टी म्हणून, गिरीष कदम कोषाध्यक्ष, हरीष मोंडकर सहायक सचिव आणि शेखर तांबे यांची ट्रस्टी म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

-------------

Web Title: Railways felicitated TC