शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा स्थानकांदम्यान प्रवासी ट्रेनमधून खाली कसे पडले? रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले अपघाताचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:01 IST

दिवा मुंब्रा स्थानकांदरम्यान सकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात आठ प्रवास धावत्या ट्रेनमधून पडले.

Mumbai Local Train Accident: मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये सकाळीच मोठी अपघाताची घटना घडली. ही घटना दिवा मुंब्रा स्थानकांदरम्यान घडली आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान फास्ट लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू झालेले प्रवासी हे कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन्ही लोकलमधील होते. ट्रेनमध्ये लटकून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या बॅग खाली पडल्यानंतर बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवासी खाली पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी हा अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

सोमवारी सकाळीच मुंबई लोकल ट्रेनमध्ये मोठा अपघात झाला. दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान धावत्या ट्रेनमधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हे प्रवासी प्रवास करत होते. मुंब्रा स्टेशनजवळ काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली.

"मुंब्रा ते दिवा लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे आठ जण खाली पडल्याची घटना घडली आहे. कसाराला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गार्डने ही घटना नोंदवली. या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना डाउन/फास्ट लाईनवरील मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. कसाराहून येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये फूटबोर्डवरून प्रवास करणारे लोक आणि त्याचप्रमाणे सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक खाली पडले आणि अपघात झाला. आठ प्रवासी खाली पडले होते. हा अपघात साडेनऊ वाजता घडला. त्यानंतर ९.५० पर्यंत या प्रवाशांना रुग्णावाहिका आणून रुग्णालयात नेण्यात आले," अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. 

"दोन्ही गाड्या या लोकल ट्रेन होत्या. त्यामध्ये ही अपघाताची घटना घडली आहे. दोन्ही लोकल एकमेकांपासून विरुद्ध दिशेने प्रवास करत होत्या. एक लोकल सीएसएमटीकडे तर दुसरी लोकल कसाऱ्याकडे जात होती. या दोन लोकलमधील प्रवासी खाली पडले. हे सर्व प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. जखमीपैकी एका प्रवाशाने सांगितले की तो फुटबोर्डवरून प्रवास करत होता. त्याच्यामागे त्याची बॅग होती आणि ती अडकल्यानंतर ही घटना घडल्याचे त्यांने सांगितले," असेही स्वप्निल नीला म्हणाले. 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलmumbraमुंब्राTrain Accidentरेल्वे अपघातAccidentअपघातcentral railwayमध्य रेल्वे