शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 2:32 AM

वालधुनी नाल्यावर रेल्वेची मोहीम : सहा तासांच्या ब्लॉकमुळे अंबरनाथ व बदलापुरात मोठी वाहतूककोंडी

अंबरनाथ : रेल्वेची कल्याणहून कर्जत दिशेकडील रेल्वेसेवा रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या वालधुनी नाल्यावरील रेल्वेपुलाचे गर्डर धोकादायक झाल्याने ते काढून नवीन गर्डर यावेळेत बसवण्यात आले. रेल्वेची यंत्रणा या ठिकाणी सहा तास काम करत होती. या रेल्वेब्लॉकमुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. मेगाब्लॉकमुळे दोन्ही शहरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

अंबरनाथ येथील वालधुनीवरील रेल्वेपुलाचा लोखंडी सांगाडा कमकुवत झाल्याने तो बदलण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. गेल्या १५ दिवसांपासून या भागात पुलावरील गर्डर आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नाल्यातून रस्तादेखील तयार करण्यात आला. गर्डर पुलाजवळ आणल्यावर रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. या कामासाठी कल्याण ते बदलापूरपर्यंतची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १० वाजता रेल्वेने रेल्वेरूळ काढून त्यांच्याखाली असलेला लोखंडी पूल काढला. त्यासाठी मोठी क्रेनदेखील मागवण्यात आली. जुना लोखंडी गर्डर काढल्यावर लागलीच त्याठिकाणी अभियांत्रिकी काम करून सिमेंट काँक्रिटचे नवीन गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर बसवताच त्यावर लागलीच रेल्वेरूळ आणि खडी टाकून हा मार्ग रेल्वेने खुला केला. ६ तास चाललेल्या या कामासाठी शेकडोच्या संख्येने रेल्वे कर्मचारी काम करत होते. सहा तासांत हे काम पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. दुसरीकडे रेल्वेने नियमित रेल्वेरूळ आणि ओव्हरहेड वायरचीही दुरुस्ती करून घेतली आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते बदलापूर यादरम्यानच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बदलापूर ते कल्याण रिक्षाभाडे १५० रुपये प्रतिप्रवासी करण्यात आले होते. पर्यायी वाहतूकसाधन नसल्याने प्रत्येकाने खाजगी वाहनांचाच आधार घेतला. त्यामुळे अंबरनाथमधील फॉरेस्टनाका, एमआयडीसी चौक, विम्कानाका, बदलापुरातील उड्डाणपूल मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस आल्यावर त्यांनी ही कोंडी सोडवली.कल्याण शहरात वाहतूक ‘ब्लॉक’; ठिकठिकाणी वाहनांची रांगच्कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते अंबरनाथ यादरम्यान रविवारी दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकचा फटका कल्याण शहरातील रस्ते वाहतुकीला बसल्याने शहरात ‘वाहतूक ब्लॉक’ झालेली पाहायला मिळाली.च्कल्याण ते अंबरनाथदरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने काहींनी रस्तेवाहतुकीला प्राधान्य दिले होते. त्यामुळे पत्रीपूल, शहाडपूल, वालधुनी पुलाबरोबरच पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे तीन अधिकारी, ३० पोलिसांसह ४० वॉर्डनमार्फत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला.च्मेगाब्लॉकदरम्यान केडीएमटीतर्फे अंबरनाथकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या १५ बस कल्याण रेल्वेस्थानक परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच फेरीवाल्यांनी व्यापलेल्या या परिसरातही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.केडीएमटीला ९० हजारांचे उत्पन्न : कल्याण ते अंबरनाथ मेगाब्लॉकच्या दरम्यान केडीएमसीतर्फे रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कल्याण-बदलापूर अशी पहिली बस सोडण्यात आली. तर, दुपारी ४ वाजता शेवटची बस सोडण्यात आली. मेगाब्लॉकदरम्यान उपक्रमामार्फत पुरवण्यात आलेल्या ५० फेऱ्यांद्वारे सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे केडीएमटीला सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ