उल्हासनगरात जुगाराच्या अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, ५३ हजारांची रोख रक्कम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:48 IST2022-01-25T14:48:02+5:302022-01-25T14:48:15+5:30

उल्हासनगरात जुगार, मटका जुगार, व्हिडिओ व पिंगपोंग जुगाराला सुगीचे दिवस

Raid on a gambling den in Ulhasnagar 10 arrested cash seized | उल्हासनगरात जुगाराच्या अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, ५३ हजारांची रोख रक्कम जप्त

उल्हासनगरात जुगाराच्या अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, ५३ हजारांची रोख रक्कम जप्त

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-५ चिराग हॉटेल जवळील दीपक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जुगार अड्ड्यावर हिललाईन पोलिसांनी सोमवारी रात्री धाड टाकून १० जुगाऱ्याना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ५३ हजार ३८० रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. 

उल्हासनगरात तीन पाणी जुगार, मटका जुगार, व्हिडिओ व पिंगपोंग जुगाराला सुगीचे दिवस आल्याची टीका शहरातून होत आहे. कॅम्प नं-५ येथील चिराग हॉटेल जवळील दीपक बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर बिनधास्त जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. माहिती द्वारे हिललाईन पोलिसांनी दीपक बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या अनंता दुधकर, अंकुश टेकाडे, विक्की उदासी, काशिद सिद्दीकी, साहेबराव वाळुंज, मनोजकुमार गुप्ता, भरत तरे, महादेव पटेल, सोनू वाघेला व संजीव भालेराव अश्या १० जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यसह ५३ हजार २८० रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.

 हिललाईन पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्या पैकी बहुतांश जण जीन्स व्यवसाय संबंधित असून असे अनेक जुगार अड्डे शहरातील विविध भागात राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी महिलेच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ७ महिला जुगाऱ्यांना अटक केली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Raid on a gambling den in Ulhasnagar 10 arrested cash seized