शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची १६ मार्चला ठाण्यात सभा, न्याय यात्रेचा चैत्यभूमीवर समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:45 IST

१७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

ठाणे : काँग्रेस खा. राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्च रोजी गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे. ठाण्यात १६ मार्चला जांभळी नाका येथे राहुल गांधी यांची सभा होईल. सभेसाठी व्यासपीठ उभारले जाणार नाही. १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा ही १६ मार्च  रोजी ठाण्यातून पुढे जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याकरिता शनिवारी सकाळी बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात आले होते. त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत यात्रेच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

भिवंडीची जागा काँग्रेसचीभिवंडी लोकसभेच्या जागेची मागणी शरद पवार यांनीदेखील केली आहे. मात्र काँग्रेसने भिवंडीची मागणी केली आहे. ही जागा काँग्रेसची होती. ती  काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. जागावाटपात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

महायुतीतील तिघांमध्ये संघर्ष राज्यात खोके सरकार असून त्यांची आपापसात भांडणे सुरू आहेत, एक आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. , आमदारांमध्ये  विधानसभा पटांगणात धक्काबुक्की झाली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संयम सुटलेले सर्व लोक त्यांच्याकडे आहेत, असे थोरात म्हणाले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपला लगावलेल्या टोल्यावर थोरात म्हणाले की, तिघांमधील संघर्ष आता दिसून येत आहे.  हा तर ट्रेलर असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण