शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचारी चौकशीच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:53 IST

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता

वाडा : शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा मोठा साठा काही दिवसांपूर्वी पकडला होता. सुमारे ५० ते ६० ट्रक लाकडाचा साठा पकडला असून हा माल नेमकी कुठून आला हे वनविभाग अद्याप निश्चित करू शकलेले नाही. तालुक्यातील भुदान पाडा (तुसे) येथील मालकी तोडून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल याच दास्तान डेपोवर टाकण्यात आला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वन तपासणी नाका असताना हा माल येथून दास्तान डेपोवर गेला कसा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून या प्रकरणात अनेक वनकर्मचारी संशयाच्या गर्तेत आहेत.वाडा मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा असल्याची खबर वनविभागाला मिळताच त्यावर धाड टाकून या डेपोत विनापरवाना ५० ते ६० ट्रक साग, खैर व इंजाली असा १०१२ घनमीटर लाकडाचा माल जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या लाकडांची किमंत ४० लाखांहून अधिक असल्याचे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यातील काही लाकडाचा माल आलमान गावातील काही शेतकºयांच्या खाजगी मालकीतील झाडे तोडून त्याचा साठा त्या दास्तान डेपोवर करण्यात आला होता, हे उघड झाले असले तरी आणखी माल कुठून आला हे वनविभाग अद्याप जाहीर करू शकलेले नाही.मात्र, वनकर्मचारी व जंगल ठेकेदार यांच्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की, यातील काही माल भुदान पाडा (तुसे) येथून तर काही माल विक्र मगड तालुक्यातील येथून आणल्याची चर्चा आहे.भुदान पाडा (तुसे) येथील ३५ सेक्शन लागलेल्या खाजगी मालकीतून सुमारे १२ ते १५ ट्रक लाकडाचा माल या दास्तान डेपोवर आणला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तुसे येथे वनोपजाची तपासणी केंद्रे असल्याने तपासणी नाका ओलांडून लाकडाचा माल दास्तान डेपोवर आलाच कसा असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. हा माल आणताना ट्रकवर ताडपत्रीचे झाकण देऊन हा माल आणला गेल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय विक्र मगड तालुक्यातील झडपोली येथूनही लाकडाचा काही माल आणल्याची चर्चा आहे.दरम्यान, लाकडाचा माल हा अनेक ठिकाणाहून आलेला असल्याने त्या त्या विभागातले वनकर्मचारी हे या प्रकरणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी असल्याने संशयाची सुई त्यांच्यापर्यत जाते. यात अनेक वनकर्मचारी गुंतले असल्याने या प्रकरणाची जिल्ह्याबाहेरील वनअधिकाºयाकडून चौकशी केल्यास सत्य उघडकीस येईल अन्यथा हे प्रकरण दाबून येथेच संपवण्याच्या प्रयत्नात वनअधिकारी असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, या प्रकणाला छापा मारणारे अधिकारी व स्थानिक अधिकारी यांच्यातील मतभेदाची किनार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळेच एवढे मोठे प्रकरण उघड झाले असून या भागातील असे अनेक दस्तानामध्ये तस्कीची लाकडे असण्याचा संशय आहे.

टॅग्स :palgharपालघरCrimeगुन्हा