शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

पाण्यासाठी केडीएमसीवर धडक, २७ गावांमधील प्रश्न तीन वर्षे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:17 IST

केडीएमसीत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली, तरी २७ गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत चांगली होती. आम्हाला आधी पाणी द्या, असा संतप्त सवाल करत ग्रामीण भागातील संतप्त महिलांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली.

कल्याण : केडीएमसीत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली, तरी २७ गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत चांगली होती. आम्हाला आधी पाणी द्या, असा संतप्त सवाल करत ग्रामीण भागातील संतप्त महिलांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली.पाणीप्रश्नाविरोधात तीन वर्षांपासून आडिवली ढोकळी प्रभागाचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील लढा देत आहेत. महापालिकेच्या महासभेत व स्थायी समिती सभेतही त्यांनी वारंवार हा प्रश्न मांडला, तसेच मोर्चाही काढला होता. मात्र, प्रशासन कोणतेच पाऊल उचलत नाही. त्यामुळे तेथील महिला पाटील यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे त्यांनी संतप्त महिलांसह मुख्यालयावर बुधवारी धडक दिली.आडिवली ढोकळी परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी ४३ लाख ४७ हजार रुपये खर्चाच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे काम सुरू केले जात नाही. याविषयी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते व राजीव पाठक यांना विचारताच ते महापालिका आयुक्तांकडे बोट दाखवतात, असे सांगण्यात येत आहे. या भागाला महापालिका केवळ दोन टँकरद्वारे पाणी पुरवते. अनेकदा नगरसेवक स्वखर्चातून टँकर पुरवतात. २७ गावांतील प्रत्येक प्रभागात दिवसाला पाण्याचे चार टँकर पाठवणे गरजेचे आहे. मात्र, ही जबाबदारीदेखील महापालिका घेत नाही. आडिवली-ढोकळी परिसरात दिवसाला आठ टँकर पाठवावेत, अशी मागणी महिलांनी यावेळी केली. नगरसेवक पाटील यांनी पाणीप्रश्न स्थायी समितीच्या सभेतही उपस्थित केला. पाण्याची समस्या का सोडवली जात नाही, तसेच अमृत योजनेंतर्गत १८० कोटींच्या पाणीयोजनेची निविदा का रद्द केली, असा सवाल केला.पाठक यांनी त्यावर सांगितले की, १८० कोटी रुपये खर्चाच्या निविदेत काही त्रुटी होत्या. रेल्वे मार्गाखालून पुश थ्रू करून जलवाहिनी टाकण्यास कंत्राटदार तयार नसल्याने हे काम जिकिरीचे आहे. हे काम निविदेच्या १८० कोटी रुपये खर्चातून वगळून आता नव्याने १६२ कोटी रुपये खर्चाची निविदा मागवली आहे. त्यावर १६ जानेवारीला चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर, निविदा ५ मार्चला उघडली जाईल. महापालिकेने जलवाहिन्यांसाठी ३७ कोटींच्या निविदेला मंजुरी दिली होती. मात्र, अमृत योजनेच्या पाणीपुरवठा योजनेतून कामे केली जाणार असल्याने ३७ कोटींची निविदाही रद्द करून ती ‘अमृत’च्या पाणीयोजनेत अंतर्भूत केली आहे. ही योजना जीवन प्राधिकरण राबवणार आहे. परंतु, ती राबवण्याचा अधिकार महापालिकेस द्यावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.>मंगळवारी होणार बैठक२७ गावांतील मुख्य रस्ते ते पोहोच रस्ते, छोट्या जलवाहिन्यांवरील टॅपिंग आणि छोट्या खर्चाची कामे यासंदर्भात आयुक्तांकडे नुकतीच एक बैठक झाली आहे. छोट्या स्वरूपाची जवळपास १५० कोटी रुपये खर्चाच्या कामाच्या फाइलवर आयुक्तांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्याला कारण महापालिका आर्थिक अडचणीत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुढील मंगळवारी पुन्हा आयुक्तांसोबत चर्चा करून या फाइलचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन सभापती दामले यांनी नगरसेवक पाटील व महिलांच्या शिष्टमंडळास दिले.>१५ दिवस कोरडेकल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरातील नागरिकांना १५ दिवस पाणीपुरवठाच केला जात नाही. तेथे विजेची समस्या असल्याने पुरवठा केला जात नसल्याचे कारण सांगितले जाते आहे, असा मुद्दा भाजपा सदस्य मनोज राय यांनी उपस्थित केला.त्यावर मात करण्यासाठी जनरेटर खरेदी करावेत. त्यामुळे विजेची समस्या उद्भवल्यास पाणीटंचाई होणार नाही. पाणीपुरवठा करणे जनरेटरमुळे शक्य होईल.जनरेटर खरेदीची तरतूद यंदाच्या आर्थिक संकल्पात केली जाणार असल्याचे आश्वासन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी दिले आहे.