शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:03 IST

भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली.

भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केली. बुधवारी ते मीरा-भार्इंदर महापालिकेतील स्थायी सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते.या बैठकीचा अहवाल राज्य सरकारला देण्यात येणार असून तत्पूर्वी राज्यातील सर्व स्थानिक प्रशासनांसह रुग्णालयाचा दौरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामगारांसाठी स्थापन केलेला आयोग आघाडी सरकारच्या काळात गुंडाळून ठेवला होता. मात्र, या सरकारने त्याचे कार्य पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्याच सरकारच्या काळात स्थायी सफाई कामगारांच्या नियुक्तीला बगल देत कंत्राटी पद्धत सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या सुविधांमधील दरी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.स्थायी कामगारांनाच सरकारी योजनांपासून वंचित ठेवले जात असताना कंत्राटी सफाई कामगारांबाबत स्थानिक प्रशासनाची उदासीनता मात्र वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. मीरा-भार्इंदर पालिकेत स्थायी कामगारांची एकूण १ हजार १८० पदे मंजूर असताना त्यातील ४५४ पदे अद्याप रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातच, कंत्राटी कामगारांची संख्या मात्र एक हजार ५९९ इतकी असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेतील कालबाह्य पदोन्नतीचा लाभ सफाई कामगारांना दिला जात असला, तरी अद्याप अनेक कामगार शिक्षणाच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यापासून वंचित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याशी चर्चा करून स्थायी कामगारांना नियमानुसार सुविधांपासून वंचित न ठेवण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनीही ग्वाही दिली. कधी अंमलबजावणी होणार याकडे लक्ष लागले आहे.पवार यांनी मीरा-भार्इंदर कामगार सेना, श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा केली.>सहा महिन्यांच्या समस्या सोडवणारकामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी पालिकेतील स्थायी सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्यांचे निवेदन अध्यक्षांना दिले. त्यावर, त्यांनी एक प्रश्नावली तयार करून पालिकेला लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले. पालिकेने दिलेल्या उत्तरात किमान सहा महिन्यांच्या कालावधीत स्थायी सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक