ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच 'क्लोज एन्काऊंटर्स', पुस्तकाचे केले अभिवाचन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:23 PM2020-02-03T17:23:04+5:302020-02-03T17:26:00+5:30

क्लोज एन्काऊंटर्स या पुस्तकाचे अभिवाचन अभिनय कट्ट्यावर करण्यात आले.  

Purushottam Berde's 'Close Encounters' on the acting plot of Thane | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच 'क्लोज एन्काऊंटर्स', पुस्तकाचे केले अभिवाचन 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच 'क्लोज एन्काऊंटर्स', पुस्तकाचे केले अभिवाचन 

Next
ठळक मुद्देठाण्यातील अभिनय कट्ट्यावर पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच 'क्लोज एन्काऊंटर्स''क्लोज एन्काऊंटर्स' पुस्तकाचे केले अभिवाचन पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच्या जीवन प्रवास अभिनय कट्ट्यावर उलगडला

ठाणे : आयुष्यातील वेगवेगळ्या  टप्प्यात वेगवेगळी माणस भेटत गेली काहींनी मनावर आपली छाप सोडली अशाच काही अवलियांना पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी फेसबुक पेजवर शब्दांवाटे मोकळीक करून दिली आणि त्याच सर्व शब्दचित्रणांचा कोलाज म्हणजे क्लोज एन्काऊंटर्स असे मत पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी व्यक्त केले.सदर पुस्तकातील काही निवडक शब्दचित्रणांचे अभिवाचन आणि पुरुषोत्तम बेर्डे ह्यांच्या जीवन प्रवास अभिनय कट्ट्यावरील कट्टा क्रमांक ४६६ वर उलगडला.

     पुरुषोत्तम बेर्डे म्हणजे मराठी कलासृष्टीतील एक अवलिया.एक सुंदर लेखक एक नाटककार एक दिग्दर्शक आणि एक सुरेख चित्रकार.एकांकिका पासून सुरू झालेला प्रवास नाटक , चित्रपट  असा प्रवास करणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी कामाठीपुरातील बालपणातून घडलेल्या  तारुण्याबद्दल आणि एक सामान्य घरातील मुलगा ते अष्टपैलू कलाकार ह्या प्रवासात त्यांच्या भावविश्वावर वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या  त्यांच्या अवतीभोवती सहज वावरलेल्या व्यक्तीरेखांचं शाब्दिक चित्रण म्हणजे क्लोज एन्काऊंटर्स.  अभिनय कट्टा ४६६ खरंच खास ठरला.आजवर ह्या रंगमंचाने अनेक कलाकारांना घडताना उलगडताना पाहिलं परंतु कट्टा क्रमांक ४६६ वर उलगडला एक विविधरंगी छटांचा अस्तित्व रेखाटून जगणारा एक अवलिया ज्याची प्रत्येक कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली.टूर टूर, जाऊ बाई जोरात ही नाटकं असू दे अथवा हमाल दे धमाल सारखा सुपरहिट चित्रपट आणि ह्या मांदियाळीत आता नवीन कलाकृतीचा समावेश झाला ते म्हणजे 'क्लोज एन्काऊंटर'. क्लोज एन्काऊंटर मधील विविध व्यक्ती चित्रणांचे अभिवाचन अभिनेता मंगेश जोशी,ज्येष्ठ रंगकर्मी जयंत करगुटकर आणि स्वतः पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी केले. आपण जे आहोत आपण जसे घडत असतो ते आपल्या सभोवती वावरणाऱ्या वस्तुस्थितीमुळे.आपण जे काही शिकतो ते त्या परिस्थिती कडूनच त्या व्यक्तींकडूनच म्हणून त्यांची ओळख ठेवणे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणे हाच एक प्रयत्न म्हणजे 'क्लोज एन्काऊंटर्स'.यश प्रत्येकाला मिळते परंतु अपयश यश मिळवण्यासाठी रामबाण औषध ठरू शकते हे मी वेळोवेळी अनुभवलंय.म्हणून यशा सोबत अपयश प्रामाणिकपणे आपण स्वीकारायला हवे असे मत पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी व्यक्त केले. 'जाऊ बाई जोरात' पासून पुरु दादा शी ओळख झाली. कलाकार म्हणून मी जे आहे त्यात जाऊ बाई जोरात चा खूप मोठा हात आहे.आज त्यांच्याच क्लोज एन्काऊंटर चे अभिवाचन करताना खूप आनंद होत आहे.आजवर खूप शिकलो आणि खूप शिकत राहू असे मत अभिनेता मंगेश जोशी ह्यांनी व्यक्त केले.  पुरु दादा आमच्या साठी चालत फिरत व्यासपीठ आजवर आम्ही कळत नकळत खूप काही शिकलो दादांकडून.त्यांच्या एकांकिका त्यांची नाटक चित्रपट त्यांचं लिखाण सोबतच त्यांची मार्मिक चित्रछटा सर्व काही वेगळच क्लोज एन्काऊंटर कुठेतरी अनेक अनोळखी चेहऱ्यांना पुरु दादांनी दिलेली शाब्दिक ओळख आणि ती कुठेतरी जवळची वाटून जातात असे मत अभिनय कट्ट्यावर संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्र आणि अभिनय कट्ट्याचे कलाकार ह्यांनी अभिनय कट्टा ह्या शीर्षक गीतावर मुकाभिनय सादर केला.

Web Title: Purushottam Berde's 'Close Encounters' on the acting plot of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.