शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुरणपोळीला यंदा २५ टक्केच मागणी, घरगुती व्यवसायामुळे दुकानांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:31 IST

होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशी आरोळी होळी पेटताच दिली जाते.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ अशी आरोळी होळी पेटताच दिली जाते. मात्र, नोकरदार महिलांना घरी पुरणपोळी बनवणे शक्य हात नसल्याने पोळीभाजी केंद्रांतून ती खरेदी केली जाते. घरगुती पुरणपोळीला जास्त पसंती दिली जात असून दरवर्षी एक ते सव्वा लाख पुरणपोळ्यांची शहरात विक्री होते. मात्र, यंदा २५ टक्केच मागणी आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.पुरणपोळी तयार करणे हे खूप जिकरीचे काम असते. हा पदार्थ बनवणाऱ्या महिला कारागीरही मिळत नाहीत. हाताने बनविलेल्या पुरणपोळीलाच ग्राहकांची पसंती असते. दुकानांमध्ये काम करणाऱ्या काही महिला स्वत: आॅर्डर घेऊन पुरणपोळ्यांची विक्री करतात. त्यासाठी होळीच्या दिवशी अनेक जणी सुटीही घेतात. ही पुरणपोळी एक ते दोन रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने ग्राहकही ती खरेदी करतात, असे विक्रेता श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले.डोंबिवलीतील काही सभागृह विविध संस्थांना चालविण्यासाठी कराराने दिली आहेत. त्या संस्थेला त्यासाठी भाडे द्यावे लागते. लग्नसराईसाठी काही विशेष कार्यालयांचेच बुकिंग केले जात असल्याने अशा संस्थांनीही आता पुरणपोळी विकण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका दुकान व्यावसायिकांच्या पुरणपोळी व्यवसायाला बसला आहे, असे पुरणपोळी विक्रेत्यांनी सांगितले.दोन ते चार रुपयांची वाढगेल्या वर्षी पुरणपोळी २४ रुपयांना मिळत होती. मात्र, यंदा किमतीत दोन ते चार रुपयांनी वाढ झाल्याने ती २६ ते २८ रुपयांना मिळत आहे. गुळाची भाववाढ झाली आहे. तसेच महिला कामगार मिळत नसल्याने पुरणपोळीच्या किमतीत वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Holiहोळीfoodअन्न