शुद्ध निर्जंतूक पेयजल जलदूत वाहन लोकार्पण

By Admin | Updated: September 29, 2015 23:50 IST2015-09-29T23:50:01+5:302015-09-29T23:50:01+5:30

मोखाडा तालुक्यांतील डोल्हारा आणि साखरी या गावातील पाणीटंचाई तसेच प्रदूषित पाण्यापासुन होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध निर्जतुक पेयजल जलदूत वाहन

Pure seperate drinking water attachment vehicle release | शुद्ध निर्जंतूक पेयजल जलदूत वाहन लोकार्पण

शुद्ध निर्जंतूक पेयजल जलदूत वाहन लोकार्पण

मोखाडा : मोखाडा तालुक्यांतील डोल्हारा आणि साखरी या गावातील पाणीटंचाई तसेच प्रदूषित पाण्यापासुन होणारे आजार टाळण्यासाठी शुद्ध निर्जतुक पेयजल जलदूत वाहन लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
साय - टेक, पुणे आणि मुंबई येथील ईसीजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तालुक्यांतील अनेक गावे डोंगरावर वसलेली असुन पिण्याचे पाणी मात्र खोल दरीत अशी अवस्था असल्याने पाणी पुरवठ्याची योजना व जलदुत वाहन योजना ही जास्तीत जास्त गावांत राबवणार असल्याचे सांगितले तसेच तालुक्यांतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करुन स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध करण्यासाठी, तसेच कुपोषण मुक्तीसाठी शासन प्रयत्नशील असून या भागाचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे पालकमंत्री सवरा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
जव्हार, मोखाड्यातील अनेक गावांत जलशुध्दीकरणाचा अभाव असल्याने जास्तीत जास्त गावांसाठी ही योजना शासन तसेच संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवणार असुन स्थानिक प्रशासनाने याची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालघर जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खा. चिंतामण वनगा, पालघर जि.परीषद अध्यक्षा सुरेखा थेतले, जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण, प्रांतअधिकारी हरिश्चंद्र पाटील तसेच भारत सरकार पुरस्कृत साय-टेक जलदुत पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे, ई. सी. जी. सी. मुंबई च्या व्यवस्थापकीय अध्यक्षा गीता मुरलीधर, मोखाडा तहसीलदार पिरजादा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे, मोखाडा पं. स. सभापती सारिका निकम, बी. डी. ओ. पी. गोडांबे, देविदास पाटील, जि. प सद्स्य प्रकाश निकम, बाबुराव दिघा, जि. प सद्स्य दिलीप गाटे, संतोष चौथे, ईश्वर गोविंद, साखरी व डोल्हारा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आदी तालुक्यांतील पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pure seperate drinking water attachment vehicle release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.