शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शहापूर तालुक्यात १४ कोटी ९० लाखांची भातखरेदी; मोठ्या संख्येने गाड्यांची आवक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:55 IST

उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सात आधारभूत केंद्रे

भातसानगर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयामार्फत भात खरेदी करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यात १४ कोटी ९० लाख ४३ हजार ४४०.७६ रुपयांची खरेदी झाली आहे.

तालुक्यामध्ये सात आधारभूत केंद्रे आहेत. आटगाव केंद्रामध्ये १२०७७. ९० क्विंटल म्हणजे दोन कोटी २५ लाख ६१ हजार ५१७. २० रुपये, किन्हवली केंद्रात १००८७.६० क्विंटल म्हणजेच १ कोटी ८८ लाख ४३ हजार ६३६.८० रुपये तर अघई केंद्रामध्ये ५५१२ क्विंटल म्हणजेच १ कोटी २९ लाख ६४ हजार १६ रुपये, वेहलोलो येथे ४५९३.९५ क्विंटल, खर्डीत १७०७२.४० क्विंटल, भातसानगर ९ हजार ९७७.५० क्विंटल, तर मुरबाड येथील धसई केंद्रात १२७३९.०७ क्विंटल भात खरेदी झाली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता आपला सातबारा दुसऱ्याला देऊ नका व आपलाच भात खरेदी केंद्रांवर आणावा, अशा प्रकारच्या सूचना उपप्रादेशिक व्यवस्थापक ए. व्ही. वसावे यांनी दिल्या आहेत. वसावे यांनी यावेळी शहापूर तालुक्यातील सर्वच केंद्रांवर भेटी देऊन शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. 

जिल्ह्यात ७९ हजार ७८९.३२ क्विंटलची खरेदीजिल्ह्याचा विचार करता ७९ हजार ७८९.३२ क्विंटल इतका भात खरेदी करण्यात आला असून, याची किंमत १४ कोटी ९० लाख ४६ हजार ४४९.७६ रुपये आहे. या वर्षी अवकाळी पावसाने शहापूर तालुक्यातील जवळजवळ पूर्णपणे भातशेती पाण्याखाली गेली असतानाही इतक्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाल्याचे बाेलले जात आहे. ही भात खरेदी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे की अन्य राज्यातील, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण सर्वच केंद्रांत आजही भाताच्या पोत्यांनी भरलेल्या गाड्या उभ्या असल्याचे चित्र आहे.