शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

प्रकाशक, विक्रेते घामाघूम

By admin | Updated: February 3, 2017 03:19 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पु.भा. भावे साहित्यनगरीत उभारलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळपासून

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पु.भा. भावे साहित्यनगरीत उभारलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळपासून प्रकाशक, विक्रेते साहित्यनगरीत दाखल झाले. पुस्तके घेऊन आलेली वाहने थेट दालनापर्यंत न सोडल्याने प्रकाशक व विक्रेत्यांची हमाली वाढली. तसेच स्टॉलसाठी त्यांना दिलेली जागा कमी आहे. मात्र, त्यासाठी जादा भाडे आकारण्यात आले. पंखे नसल्याने ग्रंथदालनाची मांडणी करताना प्रकाशक व विक्रेते घामाघूम झाले.पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात ग्रंथदालनापर्यंत पुस्तके नेण्यासाठी काही मुलांची व्यवस्था आयोजकांनी केली होती. मात्र, यंदा सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप झाल्याने कोणावरही अन्याय झाला नाही. ही समाधानकारक बाब आहे, असे प्रकाशक व वितरकांनी सांगितले. संमेलनाच्या मुख्य मंडपास लागून प्रथमच ग्रंथदालन उभारण्यात आले आहे. त्यात ३५० स्टॉल्स आहेत. १० बाय १२ आकारासाठी सहा हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जागा कमी मिळाली आहे. चार स्टॉल्सचे बुकिंग करणाऱ्यांना ३० चौरस फूट जागा कमी मिळाली आहे, अशी तक्रार प्रकाशक व वितरकांनी केली आहे. ग्रंथदालनापर्यंत वाहन नेण्याची मुभा नसल्याने पुस्तके उतरवून ती स्टॉलपर्यंत नेऊन ती मांडण्यासाठी प्रकाशकांना मोठी कसरत करावी लागली. जनार्दन भुवड यांनी सांगितले की, तीन टेबल व तीन खुर्च्या आयोजकांनी दिल्या आहेत. पुस्तके ग्रंथदालनापर्यंत नेण्यासाठी हमाल करावे लागले. नाशिकच्या ज्योती बुक स्टोअरचे बाबू पाटील यांनी सांगितले की, या ठिकाणी पंखा हवा आहे. तर, हॅलोजन लावून ठेवला आहे. उकाड्यामुळे पुस्तके मांडताना आम्ही घामाघूम झालो आहोत. ग्रंथदालनातील प्रकाशक व वितरकांच्या वास्तव्याची व्यवस्था आयोजकांनी बंदिस्त क्रीडागृह, ब्रह्मचैतन्य सभागृह आणि प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात केली आहे. मात्र, बंदिस्त सभागृह ग्रंथदालनाजवळच असल्याने वितरक व प्रकाशक त्याला अधिक पसंती आहे. बंदिस्त सभागृहात २०० जण, तर उर्वरित दोन ठिकाणी १५० जणांची व्यवस्था आहे. पुस्तकमांडणीसाठी रॅक सोयीचे पडतात. काही प्रकाशक व विक्रेत्यांनी ते सोबत आणले आहेत. आयोजकांनी टेबल दिले आहेत. पुस्तकमांडणीसाठी ते सोयीचे नाही. पुस्तक प्रदर्शनासाठी जागा कमी असल्याने ३५० प्रकाशक व विक्रेत्यांची संख्या कमी आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी साहित्य महामंडळाने प्रकाशकांकडून देणगीची अपेक्षा केली आहे. मात्र, ती पूर्ण करणे तूर्तास तरी शक्य वाटत नाही.- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा प्रकाशनगाडी ग्रंथदालनापर्यंत जात नाही. आमचे चार स्टॉल्स आहेत. पुस्तके घेऊन येण्यासाठी आम्ही १० हमाल सोबत घेऊन आलो आहोत. आयोजक व महामंडळास प्रकाशक व विक्रेत्यांची किंमत नाही. ३ तारखेनंतर ग्रंथदालनाच्या जवळ गाडी सोडली जाणार नाही, असे नियमावलीत म्हटले होते. आता कार्पेट खराब होईल, या कारणास्तव गाडी ग्रंथदालनाजवळ सोडली जात नाही. त्यामुळे आमची परवड झाली आहे. - उमेश पाटील, पाटील इंटरप्रायजेस.स्टॉल्सचा आकार कमी आहे. त्या तुलनेत सहा हजार रुपये भाडे घेण्यात आले. पॅनलपद्धती असली तरी जागेअभावी पुस्तके मांडताना अडचणी येत आहेत. तसेच ऐच्छिक मदत निधीही देणे शक्य होणार नाही.- सुनील मांडवे, संस्कृती प्रकाशन