पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST2021-07-29T04:40:16+5:302021-07-29T04:40:16+5:30
----------------------------------- कोरोनाचे ७१ रुग्ण कल्याण : केडीएमसी हद्दीत बुधवारी कोरोनाचे नवीन ७१ रुग्ण आढळून आले. उपचाराअंती १०३ रुग्णांना डिस्चार्ज ...

पुस्तकाचे प्रकाशन
-----------------------------------
कोरोनाचे ७१ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत बुधवारी कोरोनाचे नवीन ७१ रुग्ण आढळून आले. उपचाराअंती १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ८१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत एक लाख ३९ हजार सहा रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३५ हजार ५४५ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
---------
दुचाकी चोरी
कल्याण : डॉ. अभिजित पाटील यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील महावीर कॉम्प्लेक्समध्ये पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना शनिवारी भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------
आज दोन ठिकाणी लसीकरण
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत आज, गुरुवारी कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
--------------------------------------------