मतदानासाठी २७ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

By Admin | Updated: November 18, 2016 02:26 IST2016-11-18T02:26:51+5:302016-11-18T02:26:51+5:30

जिल्ह्यातील विक्रमगड, तलासरी व मोखाडा या नव्याने झालेल्या नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विविध सर्व आस्थापनातील कर्मचारी, कामगारांना मतदाना

Public holiday for voting on 27th November | मतदानासाठी २७ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

मतदानासाठी २७ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड, तलासरी व मोखाडा या नव्याने झालेल्या नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील विविध सर्व आस्थापनातील कर्मचारी, कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.
मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा उद्योगातील कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजवण्यासाठी दोन तासाची विशेष सवलत देण्यात यावी, असे कामगार अधिकारी यांनी संबधित आस्थापना यांना कळवावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. मतदान रविवारी सकाळी ७.३० पासून ते सायं ५.३० पर्यंत होणार आहे. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Public holiday for voting on 27th November