शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
3
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
4
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
5
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
6
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
7
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
8
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
9
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
10
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
11
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

ठाण्यात पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:37 IST

ठाण्याच्या समृद्ध भूमीत कलेचा आणि कलावंताचा सन्मान करणारा, शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या प्रतिष्ठेच्या पं. राम मराठे संगीत महोत्सवाला यावर्षी येत्या 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

ठाणे - ठाण्याच्या समृद्ध भूमीत कलेचा आणि कलावंताचा सन्मान करणारा, शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या प्रतिष्ठेच्या पं. राम मराठे संगीत महोत्सवाला यावर्षी येत्या 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य,नाट्य, गायन, वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने यंदाचा पं. राम मराठे संगीत महोत्सव साजरा होणार आहे. 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा संगीत समारोह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. 

संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन शिवसेना विधिमंडळ गटनेते, शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, जेष्ठ गायक प्रभाकर कारेकर, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आमदारप्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर ब्रम्हा पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी आदी उपस्थित राहणार आहेत.

संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री 7 वाजता  प्रसिद्ध बासरी वादक सुरमणी विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने होणार आहे. त्यानंतर संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रख्यात गायक उस्ताद राशिद खान यांच्या गायनाने पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप होणार आहे. शनिवारी (7 डिसेंबर) दुपारी 4.30 वाजता दीपा पराडकर यांच्या गायनाने सत्राची सुरुवात होणार आहे. त्यानंतर श्रद्धा शिंदे यांचे कथक नृत्याचे सादरीकरण  होणार आहे. सायंकाळी 6 वाजता यशश्री कडलासकर आणि रमाकांत गायकवाड यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाचे सत्र रात्री 8.30 वाजता सुरू होणार असून पं. राजेंद्र गंगाणी हे कथक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.

रविवारी (8 डिसेंबर)  दुपारी 4.30 वाजता पं. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'वसंत-वैभव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर व पं. सुरेश बापट हे पं. वसंतराव देशपांडे यांच्या वैभवशाली संगीताचा ठेवा रसिकांसाठी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता स्वरांगी मराठे व प्राजक्ता मराठे यांचे सहगायन होणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रख्यात गायिका विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामुल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होतील. तरी ठाण्याच्या संगीतप्रेमी रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिका तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे