फेरीवाल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी

By Admin | Updated: March 9, 2017 03:11 IST2017-03-09T03:11:22+5:302017-03-09T03:11:22+5:30

फेरीवाला हाही समाजाचाच एक घटक आहे. दरवेळी त्यांच्यावर फक्त कारवाई करुन उपयोग नाही, तर त्यांना हक्काची जागा, बाजारपेठ आणि इतर सुविधा देणे गरजेचे असून

Provision of budget for hawkers | फेरीवाल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी

फेरीवाल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी

ठाणे : फेरीवाला हाही समाजाचाच एक घटक आहे. दरवेळी त्यांच्यावर फक्त कारवाई करुन उपयोग नाही, तर त्यांना हक्काची जागा, बाजारपेठ आणि इतर सुविधा देणे गरजेचे असून त्यांच्यासाठीही अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणे गरजेचे असल्याचे मत ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी मांडले. फेरीवाल्यांचेही पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यांनाही कुटुंब आहे आणि याच व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर असल्याने त्याचाही विचार होणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ठाण्यात ज्या ज्या वेळी विकासाचा मुद्दा येतो तेव्हा फेरीवाल्यांना खलनायक ठरविले जाते. रस्ता रूंदीकरण असो की व्यापाऱ्यांचा मुद्दा असो; गर्दी आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा असो, दरवळी दोष फेरीवाल्यांना दिला जातो, या आक्षेपालाही राव यांनी उत्तर दिले.
ठाणे शहरात आजच्या घडीला २० हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. परंतु महापालिकेकडून ज्या पध्दतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन करुन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्या गाड्या तोडल्या जात आहेत, त्यांच्या साहित्याचे नुकसान केले जात आहे, ते चुकीचे असल्याची बाजू त्यांनी मांडली आणि फेरीवाल्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या बाजूने निर्णय देतांना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबाबत आदेश दिले आहेत. हॉकर्स झोन तयार करण्याचे नियम ाणि निकष ठरवून दिले आहेत. परंतु त्यांची पायमल्ली करण्याचे चुकीचे काम सध्या पालिकेकडून सुरु आहे. तसे न करता सेवानिवृत्त न्यायाधीश आणि दोन तज्ज्ञ मंडळींची समिती स्थापन करण्यास सुचविण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्यातही समिती स्थापन करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
फेरीवाल्यांना पिण्याच्या पाण्याची, साफसफाईची सुविधा, योग्य जागा, उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, हे न्यायालयानेच सांगितले आहे. फेरीवाल्यांवर बेरोजगारीची वेळ येणार नाही, याची काळजी घेणे हे पालिकेचे काम आहे. मागील कित्येक वर्षांपासून फेरीवाला धोरणावर केवळ चर्चा केली जाते. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती करुन फेरीवाल्यांना न्याय द्यावा, ही अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)

सामान्यांसाठी तरण तलाव हवा
प्रभाग क्रमांक १९ मध्ये सामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारचा तरण तलाव बांधून द्यावा. सध्या प्रभागात असलेला तरण तलाव महापालिकेने बांधून उच्चभ्रू वस्तीतील लोकांना अर्पण केला आहे. हा तरण तलाव पालिकेच्या जागेवर असून बीयूटी तत्त्वावर ठेकेदारास दिला आहे. त्या ठिकाणची फी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन सामान्य व्यक्तींना, गरजू-गरीब मुलांना तरणतलाव उपलब्ध करुन देऊन खऱ्या अर्थाने आमदार, खासदार आणि नगरसेवक निधीचा योग्य वापर व्हावा, ही अपेक्षा.
- प्रमोद रावराणे,
रघुनाथनगर (प्रभाग १९)

धोकादायक इमारतींचा प्रश्न
माझ्या प्रभागात २५ इमारती जीर्णावस्थेत आहे. त्या इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. या सगळ््या इमारती धोकादायक श्रेणीतील आहेत. किती वर्षे झाली, हा प्रश्न खितपत पडला आहे. बाकी काय अपेक्षा करणार?
- रोहन शास्त्री, कोपरी (प्रभाग २०)

रस्त्यांतील कामे जलद व्हावी
रस्त्यावर होत असलेली विकासकामे ही जलद गतीने व्हावीत. ठाण्यात बऱ्याच ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने अशा कामांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न भेडसावतो. कचऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. ही समस्या योग्य पद्धतीने सोडवली जावी. कचऱ्याकुंड्या ठिकठिकाणी असणे गरजेचे आहे. रस्ते खड्डेमुक्त असावेत.
- वैदेही मुळ््ये, गोल्डन पार्क सोसायटी,
गोकुळनगर (प्रभाग ११)

वस्तीतील बार बंद करा
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सोसायटीजवळ असलेले, भरवस्तीतील बार बंद करावे. रस्त्यावरील वाहतूक, दुभाजक, पदपथ या विषयांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पथदिवे असावेत.
- वैभवी मुळ््ये, गोल्डन पार्क सोसायटी, गोकुळनगर (प्रभाग ११)

फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर : नौपाडा प्रभाग म्हटले, की पटकन डोळ््यासमोर येते ती गोखले रोडवरील रहदारी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक आणि होणारी वाहतूक कोंडी. रस्त्याला लागून फुटपाथ असले तरी त्यावर मक्तेदारी मात्र फेरीवाल्यांची. जेमतेम एखादा माणूस जाऊ शकतो आणि येऊ शकतो इतका तो मार्ग. महापालिकेची अतिक्रमण हटविणारी गाडी आली की हे फेरीवाले कुठेतरी जाऊन लपतात. गाडी पुढे गेली की पुन्हा फुटपाथवर ठाण मांडतात, यावर ठोस उपाययोजनेची गरज आहे. गावदेवी येथील परिसरात रिक्षाचे जाळे वाढत आहे आणि त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही डोकेदुखी ठरत आहे. यावर पालिका प्रशासनाने तोडगा काढावा. - प्रसाद दलाल, नौपाडा, (प्रभाग २१)

Web Title: Provision of budget for hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.