कोनगावच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST2021-07-28T04:41:51+5:302021-07-28T04:41:51+5:30

भिवंडी : मुसळधार पावसाने कल्याण खाडीला पूर येऊन पुराचे पाणी भिवंडी तालुक्यातील कोनगावच्या नागरी वस्ती व शेतीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे ...

Provincial officials provide relief to flood-hit farmers in Kongaon | कोनगावच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांचा दिलासा

कोनगावच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांचा दिलासा

भिवंडी : मुसळधार पावसाने कल्याण खाडीला पूर येऊन पुराचे पाणी भिवंडी तालुक्यातील कोनगावच्या नागरी वस्ती व शेतीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी भिवंडीचे उपविभागीय डॉ. मोहन नळदकर यांनी मंगळवारी केली. यावेळी तहसीलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार महेश चौधरी व महसूल विभागातील मंडळ अधिकारी चंद्रकांत रजपूत व तलाठी बी.आर. पाटील आदी महसूल पथकासह कोनगावच्या सरपंच रुपाली कराळे, उपसरपंच दर्शन म्हात्रे व ग्रामपंचायतीचे सदस्य भरत जाधव उपस्थित होते.

डॉ. मोहन नळदकर यांनी बाधित नागरिकांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे लवकर पंचनामे करून पूरग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी यासाठी संबंधित विभागास नळदकर यांनी आदेश दिले आहेत. तसेच खाडीत रेती काढण्यासाठी रेतीमाफियांकडून अनधिकृतपणे सक्शनपंप व ड्रेझर सुरू आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनादेखील तहसीलदार अधिक पाटील यांना केल्या आहेत.

Web Title: Provincial officials provide relief to flood-hit farmers in Kongaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.