शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जांभूळ गावात मिळणार 60 भिकाऱ्यांना रोजगार, शासनाकडून दीड कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:18 IST

Thane News : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे.

- अजित मांडकेठाणे : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये असलेल्या जांभूळ गावातील  ६५ एकर पडीक जमीन आता वर्षभरात भातशेती, फळबागा, फुलबागा, मस्त्यशेतीने बहरणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा महिला बालविकास विभागाने हे पाऊल उचलले आहे. ११ नोव्हेंबरला या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. जमिनीची मशागत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानुसार, या ठिकाणी ६० भिकाऱ्यांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. त्यासोबतच येथे शेतीची अत्याधुनिक यंत्रेही  दिली गेली आहेत. ज्याचा येथील स्थानिक शेतकऱ्यांना लाभ होणार असून, त्यांना बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा  उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी शासनाने दीड कोटींचा निधी दिल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.काय काय असेल ६५ एकर जमिनीत ६५ एकरच्या जागेत दोन शेततळी आहेत. या ठिकाणी एका तळ्याचे पाणी हे भातशेती, फळबाग, फुलबागांसाठी वापरले जाणार आहे. दुसऱ्या तळ्यात मत्स्यव्यवसाय केला जाणार आहे, तर ४० एकर जागेत भातलागवड केली जाणार आहे. तीन ते चार प्रकारचा भात येथे घेतला जाणार आहे. २० बाय २० च्या जमिनीत हॉटेलमध्ये जो काही भाजीपाला लागतो, तो येथे पिकवला जाणार आहे. यामध्ये लाल शिमला, मशरूम आदींसह इतर भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. याशिवाय केरळमधील पोलाची जातीचे ५०० नारळ येथे लावले जाणार आहेत. सध्या या जमिनीत आंब्याची झाडे लावली आहेत.स्थानिकांना मिळणार रोजगार आणि शेतीची यंत्रेस्थानिकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, शिवाय त्यांना शेतीसाठी जी काही भातकापणी यंत्रे, मळणी यंत्रे, ट्रॅक्टर त्यांच्या शेतात मोफत वापरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक समिती नेमली असून, त्याद्वारे काम सुरू झाले आहे आणि लवकरच हे पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे.- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे ६५ एकरच्या जागेत विविध प्रकारची भातशेती, फळबागा, फुलबागा, भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. यासाठी एका संस्थेची निवड केली आहे.    - महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीthaneठाणे