शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:36 IST

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे.

कल्याण : लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. त्याचा निषेध म्हणून व्यायामपटू बुधवारी प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत. व्यायामशाळेचे सदस्य व शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक कैलास शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक यंत्रणेचे कामकाज जोमाने सुरू झाले आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य तसेच निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणारा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. मात्र, त्यापूर्वी क्रीडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये, असे पत्र शिंदे यांनी निवडणूक विभागाला दिले होते. तसेच केडीएमसीचे सभागृहनेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तरण तलावाची जागा देऊ नका, असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणूक विभागाकडे दिला आहे. दरम्यान, याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी प्रतिकात्मक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे व्यायामाचे सर्व साहित्य घेऊन रस्त्यावर व्यायाम करून आंदोलन केले जाणार आहे. त्यात व्यायामपटू सहभागी होणार आहेत.सुरक्षिततेच्या कारणास्तव वापर बंदच : क्रीडासंकुलाचा ताबा निवडणूक विभागाने घेतला आहे. तरणतलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता दुसºया बाजूने प्रवेश दिला जाईल, असे संबंधित विभागाकडून सांगितले जात असलेतरी सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याचा वापर करता येणार नाही. तरणतलाव आणि व्यायामशाळा बंदच ठेवावी लागेल, अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.सुटीच्या आनंदावर विरजण ?क्रीडासंकुलातील तरणतलावाचे ६३०च्या आसपास आजीवन सदस्य आहेत. ते नियमितपणे पोहोण्यासाठी येतात. तसेच व्यायामशाळेचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो.आता तर उन्हाळी सुटी सुरू होणार असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मुले सुटीत खेळासाठीही या क्रीडासंकुलाचा वापर करतात.परंतु, निवडणूक विभागाने त्याचा ताबा घेतल्याने त्यांच्या खेळावर विरजण पडणार आहे. हे टाळण्याकरता व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्र