एसटीचे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

By अजित मांडके | Updated: January 29, 2024 14:16 IST2024-01-29T14:16:10+5:302024-01-29T14:16:22+5:30

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, मुंबई,पालघर, नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी निदर्शने करणार आहेत. 

Protest movement of retired employees of ST | एसटीचे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

एसटीचे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

ठाणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील वंदना बस डेपो जवळ निषेध आंदोलन केले. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, मुंबई,पालघर, नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी निदर्शने करणार आहेत. 

उर्वरित महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचारी हे त्या - त्या विभागातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. २०१७ पासुन जवळपास ३२ हजारांहून अधिक सेवानिवृत्तांची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्या मुळे अद्याप सुरू झालेली नाही ती तात्काळ सुरु करण्यात यावी. भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी पती, पत्नी यांना फक्त सहा महिन्यांचा एसटीचा मोफत पास मिळतो तो पुर्ण वर्षांचा मिळावा व तो एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये चालावा तसेच कर्मचारी मृत पावल्यास त्याच्या पत्नीला पुढे हा मोफत पास ती हयात असे पर्यंत सुरू रहावा. कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांचीसाठी दवाखान्याची सोय करणे, सेवनिवृतांच्या मुलांना नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळावे तसेच वैद्यकीय बिलांची परिपुर्ती तात्काळ करण्यात यावी या महत्वपूर्ण मागण्यांसह अजुन अनेक छोट्या मोठ्या मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत.

Web Title: Protest movement of retired employees of ST

टॅग्स :thaneठाणे