रोषणाई न केल्याने महापाैरांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST2021-02-21T05:16:54+5:302021-02-21T05:16:54+5:30

भिवंडी : शिवजयंतीनिमित्त भिवंडी शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भिवंडी महापालिका प्रशासन ...

Protest of Mahapaira for not lighting | रोषणाई न केल्याने महापाैरांचा निषेध

रोषणाई न केल्याने महापाैरांचा निषेध

भिवंडी : शिवजयंतीनिमित्त भिवंडी शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भिवंडी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी रोषणाई, सुशोभीकरण न केल्याने भिवंडीच्या महापाैर प्रतिभा पाटील यांच भाजप युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी निषेध केला. यावेळी या पुतळ्यासमाेर कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली.

भिवंडी महापालिकेतील सत्तेत काेणार्क विकास आघाडीसाेबत भाजप असल्याने शिवजयंतीदिनी केलेल्या निषेधाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काेराेनाच्या नियमांचे उल्लंघन करून भरवलेल्या महापाैर चषकासाठी लेझर राेषणाई करून लाखाे रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापाैर आणि महापालिका प्रशासनावर टीका केली. हे करत असताना त्यांना शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विसर पडल्याबाबत भाजपचे ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भावेश सुनील पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विशाल डुंबरे, वैभव काठवले, संदीप सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Web Title: Protest of Mahapaira for not lighting