भिवंडीत भाजपा महिला मोर्चाकडून झारखंडच्या धीरज साहू यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

By नितीन पंडित | Published: December 11, 2023 04:51 PM2023-12-11T16:51:40+5:302023-12-11T16:52:20+5:30

भिवंडीत भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे यांच्या नेतृत्वाखाली धीरज साहू यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.

Protest against the statue of Dheeraj Sahu from Jharkhand by BJP Mahila Morcha in Bhiwandi | भिवंडीत भाजपा महिला मोर्चाकडून झारखंडच्या धीरज साहू यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

भिवंडीत भाजपा महिला मोर्चाकडून झारखंडच्या धीरज साहू यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

भिवंडी : झारखंड मधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरामध्ये २७९ कोटी रुपये सापडल्या नंतर भाजपा देशभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करीत असून भिवंडीतभाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे यांच्या नेतृत्वाखाली धीरज साहू यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,शहर सरचिटणीस राजू गाजंगी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पना शर्मा, रेखा पाटील,नर्मदा टावरे यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेस सरकारने गेल्या ७० वर्षांमध्ये फक्त भ्रष्टाचारच केला असून त्याचा नवा चेहरा झारखंड मधून समोर आला आहे त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया महिला मोर्चा शहराध्यक्षा सुनीता टावरे यांनी दिली आहे. झारखंड मधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरामध्ये शेकडो कोटी रुपये सापडल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाली आहेत.धीरज साहू यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करीत त्यांचा पुतळा पेटविण्याचा प्रयत्न महिलांनी केला त्यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.यावेळी पोलीस व काही आंदोलांकर्त्यांमध्ये काही प्रमाणात झटापट देखील झाली .
 

Web Title: Protest against the statue of Dheeraj Sahu from Jharkhand by BJP Mahila Morcha in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.