काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांधल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:37+5:302021-08-22T04:42:37+5:30

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. तालुकाध्यक्ष चेतनसिंह ...

Protect government employees built by women Congress workers | काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांधल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राख्या

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांधल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राख्या

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतून युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, जयवंत पवार, भारती टोहके, एकनाथ कंटे, अमोल चोरघे आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

रक्षाबंधनाचा कार्यक्रम मुरबाड तालुका पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालयात पार पडला. तालुक्यात अधिकारी-कर्मचारी हे बाहेरील विभागातून आपली जबाबदारी पार पाडत असतात. पण, कामाच्या व्यापामुळे त्यांना रक्षाबंधनाला बहिणीकडे जाता येत नाही. म्हणून मागील सहा वर्षांपासून आम्ही रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आहोत, असे चेतनसिंह यावेळी म्हणाले. हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिला काँग्रेसने पुढाकार घेऊन आयोजित केल्याबद्दल त्यांचे मुरबाड तालुका पोलीस प्रभारी अधिकारी दत्तात्रेय बोराटे यांनी या उपक्रमाबद्दल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Web Title: Protect government employees built by women Congress workers